पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध अभिनेते गायक आणि राजकारणी मनोज तिवारी सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. वयाच्या ५१ व्या वर्षी ते पुन्हा वडील होणार आहेत. (Manoj Tiwari) मनोज तिवारी यांची पत्नी सुरभी तिवारी लवकरच बाळाला जन्म देणार आहे. या जोडप्याने बेबी शॉवरचा कार्यक्रम आयोजित केला होता. या बेबी शॉवर पार्टीत मनोज आणि सुरभी तिवारी यांचे जवळचे मित्र उपस्थित होते. या पार्टीशी संबंधित एक व्हिडिओही मनोज तिवारी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Manoj Tiwari)
भोजपुरी गायक आणि अभिनेते तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. तो त्याच्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. व्हिडिओमध्ये मनोज तिवारी आणि त्यांची पत्नी पारंपरिक लूकमध्ये दिसत आहेत. व्हिडिओमध्ये सुरभी तिवारी यांनी लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. यासोबतच त्यांनी खूप सारे दागिनेही घातले आहेत. व्हिडिओमध्ये सुरभी तिवारी या संपूर्ण लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत.
दुसरीकडे, मनोज तिवारी पेस्टल गुलाबी रंगाच्या शेरवानीमध्ये दिसत आहेत. व्हिडिओमध्ये त्यांची मुलगी सान्विकाही दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना मनोज तिवारी यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'काही आनंद आम्ही शब्दात वर्णन करू शकत नाही… आम्ही ते फक्त अनुभवू शकतो..' मनोज तिवारी यांच्या पत्नीच्या बेबी शॉवरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहत्यांसह चित्रपटातील सर्व कलाकार त्यांचा व्हिडिओ लाईक करत आहेत. तसेच कमेंट्सद्वारे त्यांचे अभिनंदन करत आहेत.