Kamal Haasan : कमल हसन यांची प्रकृती बिघडली, चेन्‍नईतील रुग्‍णालयात उपचार

Kamal Haasan : कमल हसन यांची प्रकृती बिघडली, चेन्‍नईतील रुग्‍णालयात उपचार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दाक्षिणात्‍य सुपरस्‍टार कमल हसन यांची प्रकृती बिघडली असून, त्‍यांच्‍यावर चेन्‍नईतील रुग्‍णालयात उपचार करण्‍यात आले.  डॉक्‍टरांनी त्‍यांना पुढील काही दिवस विश्रांती घेण्‍याचा सल्‍ला दिला असल्‍याचे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे. दरम्‍यान, याबाबत कमल हसन यांच्‍याकडून कोणतेही निवेदन जाहीर करण्‍यात आलेले नाही.

रिपोर्टनुसार, बुधवार रात्री कमल हसन हैदराबादहून चेन्‍नईला परत येत होते. यावेळी त्‍यांची प्रकृती बिघडली. त्‍यांना अस्‍वस्‍थ वाटू लागले. तसेच त्‍यांना सौम्‍य तापही आला. हैदराबादहून चेन्‍नईला पोहचताच त्‍यांना एका खासगी रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. येथे त्‍यांच्‍यावर उपचार करण्‍यात आले. आज ( दि. २४) सकाळी त्‍यांना डिस्‍चार्ज मिळाला. मात्र डॉक्‍टरांना पुढील काही दिवस त्‍यांना घरीच विश्रांती घेण्‍याचा सल्‍ला दिला आहे.

कमल हसन सध्‍या दिग्‍दर्शक शंकर यांच्‍या आगामी इंडियन २ चित्रपटाच्‍या चित्रीकरणात व्‍यस्‍त आहेत. तामिळ बिग बॉसच्‍या सहाव्‍या सीझनचे सूत्रसंचालनात ते व्‍यस्‍त आहेत. सातत्‍याने चित्रीकरण आणि प्रवास यामुळे त्‍यांची प्रकृती बिघडली. त्‍यांना तणाव आणि थकवा जाणवू लागल्‍याने त्‍यांनी रुग्‍णालयात जावून उपचार घेतले. इंडियन 2 चित्रपटाच्‍या चित्रीकरणानंतर कमल हसन ख्‍यातनाम दिग्‍दर्शक मनीरत्‍नम यांच्‍याबरोबर 'केएच २३४'  चित्रपटात काम करणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news