जेनिफर लोपेजचा बेन एफ्लेकसोबत किसिंग व्हिडिओ व्हायरल

जेनिफर लोपेजचा बेन एफ्लेकसोबत किसिंग व्हिडिओ व्हायरल

पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री, गायिका जेनिफर लोपेज आणि अभिनेता, चित्रपट निर्माता बेन एफ्लेक यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ ७८ व्या वेनिस इंटरनॅशनल चित्रपट महोत्सवातील रेड कार्पेटवरील आहे. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार रात्री जेनिफर लोपेजचा बेनचा आगामी चित्रपट 'द लास्ट ड्युएल' चा प्रीमियर होता. त्यावेळी ही हातात हात घालून ही जोडी रेड कार्पेटवर उतरली. चक्क फोटोग्राफर्ससमोर दोघांनी फोटोसाठी पोझ दिली. शिवाय दोघे लिप लॉक करत आलिंगन करताना दिसले.

आपल्या बॉयफ्रेंडच्या समर्थनार्थ लोपेजने ग्लॅम-अप लुकने सर्वांचे लक्ष वेधू घेतले.

तिने एक व्हाईट जॉर्जेस होबिका गाऊन परिधान केला होता.

५२ वर्षांच्या लोपेजने व्हाईट गाऊनमध्ये रेड कार्पेटवर जलवा दाखवला.

४९ वर्षांचा बेन ब्लॅक टक्सीडोमध्ये खूप सुंदर दिसत होते. रेड कार्पेटवर दोघांचा रोमँटिक मूडदेखील पाहायला मिळाला.

दोघे रोमँटिक अंदाजात एकमेकांशी बोलताना आणि किस करताना दिसले.

. तिने चमकदार काळ्या रंगाचा बूट घालून आपला लूक पूर्ण केला.

या जोडीने पहिल्यांदा २००२ सालापासून एकमेकांना डेट केले.

नोव्हेंबर २००२ मध्ये दोघांनी साखरपुडा केला होता.

२००४ मध्ये ते वेगळे झाले होते.

पण, एप्रिलमध्ये त्यांचा पुन्हा रोमँटिक सीझन आला. पुन्हा एकदा ते रोमँटिक मूडमध्ये सर्वांच्या समोर आले.

लोपेज आणि बेन यांच्या जोडीला Bennifer असं नाव देण्यात आलं होतं.

हे दोघे पहिले सेलेब्रिटी कपल होते. ज्यांना फॅन्सकडून निकनेम मिळालं होतं.

आता १८ वर्षांनंतर दोघे आता एकमेकांना डेट करत आहेत. फॅन्सना आशा आहे की, दोघांचं नातं आता कायम होईल.

हेही वाचलं का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news