मुंबई; पुढारी ऑनलाईन: टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे ही आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. दिवंगत अभिनेता सुंशातसिह रजपूतच्या ब्रेकअपनंतर गेल्या तीन वर्षांपासून अंकिता ही विक्की जैनला डेट करत आहे. यादरम्यान, अंकितासोबत 'पवित्र रिश्ता २' मध्ये काम करणारा अभिनेता शाहीर शेख याने अंकिता आणि विकी जैन यांच्या लग्नाबद्दल एक खुलासा केला आहे.
नुकतेच झालेल्या एका मुलाखतीत शाहीर शेखने याबाबतचा खुलासा केला आहे. या मुलाखतीत शाहीर आणि अंकिता दोघेही सहभागी झाले होते. यावेळी अंकिताला 'पवित्र रिश्ता २' या मालिकेनंतर काय करणार आहेस? अशा प्रश्न विचारण्यात आला. यानंतर अंकिता गप्प बसली; परंतु, याचे उत्तर देताना अंकिताचा कोस्टार शाहीर शेखने यानंतर ती लवकरच लग्न करणार असल्याचे म्हटले.
हे ऐकून अंकिताला धक्का बसला आणि तिने लगेच शाहीर शेखला गप्प राहण्यास सांगितले. यात तिने 'तू वेडा आहेस का?', 'गप्प बस' असेही म्हटले. यानंतर शाहिरला आपण चुकीचे बोललो असल्याची चूक लक्षात आली त्याने याबद्दल नेमकी माहिती नसल्याचेदेखील म्हटले.
यानंतर अंकिताने परिस्थिती सावरत या शोनंतर काहीही योग्य नियोजन नसल्याचे म्हटले. यानंतर अंकिताने पुढच्या वर्षाच्या फेब्रुवारीपासून काहीतरी नवीन सुरू होईल. असा संकेत दिला आहे. या घटनेवरून अंकिता आणि विक्की जैन दोघेजण लग्न करणार आहेत की नाही? याबाबत ठोस अशी माहिती अद्याप मिळालेली नाही.
अंकिता लोखंडे गेल्या तीन वर्षांपासून विकी जैनला डेट करत आहे. दोघांचा साखरपुडादेखील झाला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला दिलेल्या मुलाखतीत अंकिताने म्हटले होते की, 'मी प्रत्येक मुलीप्रमाणे आनंदी वैवाहिक जीवनाची इच्छा करते, कारण, लग्न ही खूप सुंदर गोष्ट आहे. होय, मी माझ्या लग्नाबद्दल खूप उत्सुक आहे आणि लवकरच लग्न करणार आहे. मला जयपूर-जोधपूर सारखे राजस्थानी विवाह आवडतात. परंतु, आजपर्यंत यासंदर्भात तयारी सुरू झालेली नाही.
विकी जैनच्या आधी अंकिता लोखंडे दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला डेट करत होती. 'पवित्र रिश्ता' मध्ये एकत्रित काम करत असताना दोघांना प्रेम झाले. परंतु, २०१६ मध्ये दोघांचा ब्रेकअप झाला हाेता.
हेही वाचलंत का?