मूळव्याध टाळायचा असेल तर खा ‘हे’ गुणकारी पदार्थ

मूळव्याध टाळायचा असेल तर खा ‘हे’ गुणकारी पदार्थ
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: मूळव्याध हा प्रचंड वेदनादायी आणि त्रासदायक आजार. गुदद्वाराला सूज येते आणि मलविसर्जन करताना प्रचंड वेदना होतात. मूळव्याध असेल तर शौचातून रक्तही पडते. मूळव्याध किंवा पाइल्स यात दोन प्रकार असतात. पहिला अंतर्गत मूळव्याध आणि दुसरा बाह्य मूळव्याध.

अंतर्गत मूळव्याधामध्ये मलविसर्जन करताना रक्त पडते. बाह्य मूळव्याधामध्ये गुद्द्वारच्या आजूबाजूच्या भागावर सूज येते त्यामुळे वेदना होतात तसेच खाजही सुटते.

अशा या वेदनादायी आजारावर मात करण्यासाठी खाण्यापिण्यावर कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते मूळव्याध असलेल्या व्यक्तींनी फायबरयुक्त म्हणजे तंतूमय पदार्थ खाले पाहिजेत. तसे भरपूर पाणी पिण्याबरोबरच फळांचा रसही घ्‍यावा.

व्याधी असलेल्यांनी काय खावे

मूळव्याध असलेल्यांनी तृणधान्य खाल्लं पाहिजे. संपूर्ण तृणधान्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मल विसर्जन करताना  त्रास होत नाही.

त्यामुळे शौचाला गेल्यावर होणाऱ्या वेदना कमी होतात. अँटीऑक्सिडेंट्स आणि पोषक द्रव्यांनी समृद्ध असलेली फळे मल त्यागावर नियंत्रण ठेवतात.

मुळव्याधाने ग्रस्त असलेल्या लोकांनी सफरचंद, द्राक्षे, जांभूळ व द्राक्ष यासारखी फळे खावीत. सफरचंद किंवा द्राक्षांची साल काढून टाकू नये.

हर्बल टी उपयुक्त

बाजारात मिळत असलेल्या हर्बल टी हे मूळव्याधीवर उपयुक्त ठरत असतात. हर्बल टी प्यायल्याने गुदद्वाराला आलेली सूज कमी होते तसेच शौचावाटे जाणारे रक्त कमी होते.

भरपूर केळी खा

मूळव्याधामुळे त्रस्त असलेल्या व्यक्तींनी केळी खाल्ल्यास त्याला खूप फायदा होऊ शकतो. केळामुळे गुदद्वारातील दाह कमी होतो. मलविसर्जन करताना त्रास होत नाही.

केळींमुळे बॅक्टेरिया वाढीस प्रतिबंध होतो. त्यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे मुळव्याधावर प्रभावी फळ म्हणून त्याकडे पाहिले जाते.

भरपूर पाणी प्या

आहारामध्ये भरपूर पाणी पिले पाहिजे. पाणी मुळव्याधाची समस्या नियंत्रित करते. पाणी प्यायल्याने पाण्याची कमतरता पूर्ण भरुन निघते.
मूळव्याध असलेल्या व्यक्तीने दररोज किमान ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने फायदा होतो. भाज्यांचा आहार घेतल्याने पचनक्रिया सुरळीत होते. मुळव्याधाच्या रुग्णांना ब्रोकोली, कोबी, गाजर, फ्लॉवर आणि टोमॅटो खाण्याचा सल्ला दिला जातो. या भाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते.

भूरपूर ज्यूस प्या

शरीरातील पाण्याची पातळी समतोल राहण्यासाठी विविध प्रकारचे ज्यूस पिले पाहिजेत. ज्यूसमुळे गुदद्वाराची सूज आणि वेदना कमी होतात. ब्लूबेरी, ब्लॅकबेरी आणि चेरी सारखी फळे गुदाशय आणि गुद्द्वाराजवळील नसा मजबूत करतात.

तळलेले पदार्थ, ब्रेड टाळा

मूळव्याधाचा त्रास असल्यास फ्रेंच फ्राईज, तळलेले पदार्थ टाळणे जास्त खाणं टाळा. तळलेल्या खाद्यपदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात फॅट असते. त्यामुळे पचनक्रिया बिघडते. मसाल्यांमुळे आम्ल वाढते आणि सूज वाढत जाते. ब्रेड पचणे खूप कठीण असते. त्यामुळे बद्धकोष्टता वाढते. त्यामुळे मूळव्याध असलेल्यांनी ब्रेड टाळावा, तसेच कॉफीमुळे डीहायड्रेशन होण्याची शक्यता असते. त्यामुळे ब्रेड आणि कॉफी टाळली पाहिजे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news