HBD Dia Mirza : दियाकडे आहे सुंदर साड्यांचे कलेक्शन (Photos)

Dia Mirza
Dia Mirza

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या अदाकारीने आणि सौंदर्याने प्रत्येकाच्या मनात स्थान अढळ करणाऱ्या अभिनेत्री दिया मिर्झाचा आज ४१ वा वाढदिवस आहे. (HBD Dia Mirza) दियाचा जन्म ९ डिसेंबर, १९८१ रोजी हैदराबादमध्ये झाला. वयाच्या १९ व्या वर्षांपासून तिने काम करायला सुरुवात केली होती. काम करता करता तिला मॉडेलिंगची ऑफर मिळू लागली होती. (HBD Dia Mirza)

दियाच्या आई दीपा या बंगाली हिंदू आहेत. तर तिचे वडील फ्रँक हेड्रिच जर्मन आहेत. ती चार वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. त्यानंतर दियाच्या आईने हैदराबादचे अहमद मिर्झा यांच्यासोबत लग्न केले होते.

दियाने हैदराबादमधून शिक्षण घेतले आहे. कॉलेजमध्ये असताना तिने काम करायला सुरुवात केली.

सुरुवातीला एका मीडिया फर्ममध्ये ती मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होती.

दरम्यान तिला अनेक बड्या कंपन्यांकडून मॉडेलिंगची ऑफर मिळू लागली.

दिया मिर्झाने २००० साली फेमिना मिस इंडिया या सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत ती सेकंड रनर अप ठरली होती.

वयाच्या १९ व्या वर्षी दियाने (सन २०००) मिस आशिया पॅसिफिकचा किताब पटकावला होता.

बॉलिवूडमधील हिट चित्रपटांमध्ये केलं काम

दियाचा २००१ मध्ये 'रहना है तेरे दिल में' हा चित्रपट हिट झाला होता. या चित्रपटातून ती चित्रपट इंडस्ट्रीत एन्ट्री केली होती. या चित्रपटात आर. माधवनची मुख्य भूमिका होती. पुढे तिने दम, लगे रहो मुव्वाभाई, दीवानापन, तुमको ना भूल पायेंगे, संजू या हिट चित्रपटांमध्ये अभिनय केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news