छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं : भारती- बयोंच्या आयुष्यात आले नवे वळण; काय होणार परिणाम? | पुढारी

छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं : भारती- बयोंच्या आयुष्यात आले नवे वळण; काय होणार परिणाम?

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावर शिक्षणासाठीची जिद्द आणि स्वप्नांची ओढ, असा वेगळा विषय हाताळत ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ ही मालिका चाहत्यांच्या भेटीला आली. ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ ही मालिका सध्या एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. बायोच्या शिक्षणाच्या जिद्दीचा अनोखा प्रवास या मालिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे. मालिकेत आता बायो आणि इरा यांच्यातील परीक्षेमधील चुरस सध्या पाहण्यास चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ मालिकेत आता एका वेगळ्या वळणावर आली असून भारती आणि शुभंकर यांच्या लग्नानंतर बयो आणि भारती यांच्या आयुष्यात वेगळे वळण पाहायला मिळणार आहे. त्याचे परिणाम बयो आणि भारती यांना भोगावे लागणार आहेत.

एकिकडे भारतीला गावातील लोकांचे बोलणे ऐकावे लागणार आहे. तर दुसरीकडे इरा आणि बयो यांचा विज्ञान परीक्षेच्या तयारीतही खंड पडेल का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. परंतु, आता शुभंकर म्हणजेच, बयोचा काजवा तिच्याबरोबर असल्याने स्वप्नपूर्तीसाठी त्याची मदत होऊ शकते का?, हे पाहणे चाहत्यासाठी महत्त्वाचे ठरेल. शिक्षणाच्या जिद्दीचा हा अनोखा प्रवास बयोचं डॉक्टर होण्याचं स्वप्न कसं पूर्ण करणार?, हे पाहण्यासाठी चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button