सोमेश्वरनगर : जनसंपर्क कार्यालय लोकहितकारी : आ. अ‍ॅड. अशोक पवार | पुढारी

सोमेश्वरनगर : जनसंपर्क कार्यालय लोकहितकारी : आ. अ‍ॅड. अशोक पवार

सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा : सोमेश्वरनगर (करंजेपूल) येथील सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषी गायकवाड यांनी सुरू केलेल्या जनसंपर्क कार्यालयामुळे कारखान्याच्या सभासदांसह सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागत असून ते लोकहितकारी आहे, असे मत शिरूरचे आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांनी व्यक्त केले. सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर देवस्थानला आमदार पवार यांनी सपत्नीक भेट देत सोमेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना भेटी देत परिसरातील उद्योग व्यवसायाची माहिती घेतली.

यावेळी सोमेश्वरचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, करंजेपूलचे माजी सरपंच बाळासाहेब गायकवाड, अनिल गायकवाड, एकता पथसंथेचे अध्यक्ष शिवाजीराव गायकवाड, करंजेपूलचे उपसरपंच नीलेश गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आमदार पवार म्हणाले, अशा जनसंपर्क कार्यालयामुळे जनतेशी सहज संपर्क ठेवता येतो, तसेच त्यांच्या समस्या आपण सहजपणे जाणून घेऊ शकतो.

दरम्यान सोमेश्वरनगर येथील पत्रकार दत्ता माळशिकारे, अ‍ॅड. गणेश आळंदीकर, संतोष शेंडकर, महेश जगताप, युवराज खोमणे यांच्याशी सहकारी साखर कारखानदारी संदर्भात अनेक वेळ चर्चा केली. पवार यांनी यावेळी वाकी येथील डॉ. रवींद्र सावंत यांच्या गाईंच्या गोठ्याला भेट देत दूध धंद्याची माहिती घेतली.

Back to top button