Gold Rate Today | सोने आज पुन्हा महागले, जाणून घ्या प्रति तोळ्याचा दर

Gold Rate Today | सोने आज पुन्हा महागले, जाणून घ्या प्रति तोळ्याचा दर

पुढारी ऑनलाईन : देशात सणासुदीच्या तोंडावर आणि इस्रायल-हमास युद्धादरम्यान सोन्याच्या दरात बदल झाला आहे. आज मंगळवारी शुद्ध सोन्याचा दर २०० रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ५७,५३२ रुपयांवर खुला झाला. काल सोमवारी हा दर ५७,३३२ रुपयांवर बंद झाला होता. आज त्यात तेजी दिसून आली. तसेच चांदीचा दरही (silver rate today) प्रति किलो ६८,४९३ रुपयांवर ६८,६२८ रुपयांवर पोहोचला आहे. (Gold Rate Today)

संबंधित बातम्या 

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज मंगळवारी शुद्ध सोन्याचा म्हणजेच २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५७,५३२ रुपये, २३ कॅरेट ५७,३०२ रुपये, २२ कॅरेट (today gold rate 22 carat) ५२,६९९ रुपये, १८ कॅरेट ४३,१४९ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ३३,६५६ रुपयांवर खुला झाला. तर चांदीचा दर प्रति किलो ६८,६२८ रुपयांवर खुला झाला आहे.

सोन्याचे दर कधी वाढतात?

सोन्याची किंमत सोन्याची मागणी आणि पुरवठा यावर निश्चित होते. सोन्याची मागणी वाढल्यास दरही वाढतात. सोन्याचा पुरवठा वाढल्यास दर कमी होतात. जागतिक स्तरावरील आर्थिक परिस्थितीचा सोन्याच्या किंमतीवर प्रभाव राहतो. जर आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था कठीण परिस्थितीतून जात असेल तर गुंतवणूकदार सोन्यात सुरक्षित गुंतवणुकीचा (सेफ हेवन) पर्याय निवडतात. यामुळे दर वाढतात. ज्यावेळी भू-राजकीय तणाव वाढतो तेव्हाही सोन्याच्या दरात तेजी येते.

शुद्ध सोने असे ओळखा?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते. (Gold Rate Today)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news