Gurpatwant Singh Pannu | वन डे वर्ल्ड कप दरम्यान हल्ल्याची धमकी, खालिस्तानी दहशतवादी पन्नू विरोधात FIR

Israel Hamas War
Israel Hamas War
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : आयसीसी वन डे वर्ल्ड कपमधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी खलिस्तानी समर्थकांनी हल्ला करण्याची धमकी दिली होती. खलिस्तानी बंदी घालण्यात आलेली संघटना शिख फॉर जस्टिस (SFJ) चा संस्थापक आणि दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannu) याने ही धमकी दिली होती. या प्रकरणी गुरपतवंत सिंग पन्नू यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आले आहे. विविध सोशल मीडिया हँडलवरुन धमक्या देणारे रेकॉर्डिंग मेसेजीत प्रसिद्ध करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पन्नू विरुद्ध १२१(A), १५३(A)(B), ५०५ IPC, UAPA आणि IT Act ६६ F अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती अहमदाबादचे सायबर क्राइम विभागाचे डीसीपी अजित रज्जन यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

१४ ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणार्‍या भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. याशिवाय अंतिम सामन्यातही हल्ल्याची धमकी मिळाली आहे. जुलै २०२० मध्ये पन्नू याला यूएपीए (UAPA) अंतर्गत दहशतवादी घोषित करण्यात आले होते.

वर्ल्ड कप सामन्यांदरम्यान हल्ला करण्याची धमकी देणारे पन्नूचे कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये त्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओटावा येथील भारतीय राजदूत संजय कुमार वर्मा यांच्यावर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. (gurpatwant singh pannu latest news)

पन्नूची भारताला धमकी

व्हायरल झालेल्या ऑडिओमध्ये पन्नू म्हणतो की, "निज्जरच्या हत्येबद्दल, आम्ही तुमच्या गोळ्यांच्या विरोधात मतपत्राचा उपयोग आहोत. आम्ही तुमच्या हिंसेविरोधात मताचा वापर करणार आहोत. लक्षात ठेवा, या ऑक्टोबरमध्ये वर्ल्ड क्रिकेट कप होणार नाही. हा वर्ल्ड कप नाही, तर वर्ल्ड दहशत कपची सुरुवात असेल. हा संदेश SFJ जनरल काउंसिल गुरपतवंत सिंग पन्नू यांचा आहे." (Gurpatwant Singh Pannu)

कुख्यात खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नू याचा चंदीगडमधील सेक्टर सी-१५ मधील बंगला जप्त करण्यात आला होता. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) तशी नोटीस बंगल्यावर लावली होती. पन्नू हा प्रतिबंधित शीख फॉर जस्टिस या दहशतवादी टोळीचा म्होरक्या आहे. तो कॅनडा, अमेरिका आदी देशांतून भारतविरोधी प्रपोगंडा चालवत असतो. निज्जर हत्येवरून उद्भवलेल्या कॅनडा- भारत वादात पन्नूने कॅनडात राहत असलेल्या हिंदूंना कॅनडा सोडण्याची उघड धमकी दिली होती. अमृतसरलगतच्या खानकोट या पैतृक गावातील पन्नूची मालमत्ता (शेती) जप्त करण्यात आली आहे.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news