Hardeep Singh Nijjar Murder Video : निज्जरच्या हत्येचा व्हिडीओ आला समोर; झाडल्या होत्या ५० गोळ्या | पुढारी

Hardeep Singh Nijjar Murder Video : निज्जरच्या हत्येचा व्हिडीओ आला समोर; झाडल्या होत्या ५० गोळ्या

वॉशिंग्टन : कॅनडामध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येत एकूण सहाजण सामील होते, असा दावा अमेरिकन न्यूज वेबसाईट ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने केला आहे. या वेबसाईटला निज्जरच्या हत्येचे एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे, जे त्यांनी पोलिसांनाही सोपवले आहे. (Hardeep Singh Nijjar Murder Video)

हा व्हिडीओ सार्वजनिक करण्यात आलेला नाही. मात्र, त्यामधून स्पष्ट झाले आहे की, दोन हल्लेखोरांनी निज्जरच्या दिशेने एकूण 50 गोळ्या झाडल्या होत्या, त्यापैकी निज्जरला 34 गोळ्या लागल्या. (Hardeep Singh Nijjar Murder Video)

संबधित बातम्या : 

हे सीसीटीव्ही फुटेज 90 सेकंदांचे आहे. त्यामध्ये हल्लेखोर शीख परिधानात दिसून येत आहेत. वॉशिंग्टन पोस्टच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी दोन मोटारींमधून निज्जरच्या पिकअप ट्रकचा बराच वेळ पाठलागही केला होता. निज्जरने ज्यावेळी आपल्या ट्रकचा वेग वाढवला त्यावेळी हल्लेखोरांनीही वेगाने पाठलाग सुरू केला. काही वेळात हल्लेखोरांची सिल्व्हर रंगाची टोयोटा कॅमरी कार ट्रकच्या समोर आली. त्यामुळे निज्जरने ट्रक थांबवला. त्यानंतर काळा स्वेटशर्ट परिधान केलेले दोघेजण बाहेर पडले आणि त्यांनी गोळ्या झाडल्या. (Hardeep Singh Nijjar Murder Video)

हेही वाचा : 

Back to top button