Building Collapse : दिल्लीत ७० वर्ष जूनी इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू

Building Collapse : दिल्लीत ७० वर्ष जूनी जीर्ण इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू
Building Collapse : दिल्लीत ७० वर्ष जूनी जीर्ण इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : Building Collapse : धोकादायक इमारतींच्या यादीत असलेली एक ७० वर्ष जूनी इमारत सोमवारी कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्यात काही मजूर अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

राजधानी दिल्लीतील सब्जी मंडी परिसरात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तसेच बचाव पथकासह अग्निशमन दलाच्या सात बंबांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

यावेळी दोन मुलांसह एकाला बाहेर काढण्यात आले. त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण दोन मुलांचा मृत्यू झाला. मलब्याखाली काही वाहनेही अडकले असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकागंज जवळील सब्जी मंडी, घंटा घराजवळ रॉबिन सिनेमा नजीक ही घटना घडली. सोमवार दुपारी ११ वाजून ५० मिनिटांनी यासंबंधी पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर बचाव पथकांनी तात्काळ घटनास्थळ गाठले.

राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दुःख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंद दु:खद आहे. प्रशासनाकडून बचाव तसेच मदतकार्य सुरू आहे. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून स्थितीवर नजर ठेवून असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

दुर्घटनाग्रस्त इमारत ही ७० वर्ष जूनी होती, अशी माहिती समोर आली आहे. महानगर पालिकेले या इमारतीला यापूर्वीच धोकादायक इमारत म्हणून घोषित केले आहे. पंरतु, इमारतीच्या सर्वात खालच्या बाजूला एक मिठाईचे दुकान होते.

घटनेच्या वेळी ४ ते ५ मजूर दुकानात ड्रिलिंगचे काम करीत होते.हे काम करीत असतानाच अचानक इमारत कोसळ्याची माहिती प्रत्यक्षदर्शीकडून देण्यात आली आहे.

इमारत कोसळत असताना रस्त्यावरून जाणारा एक परिवार इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सापडला. दोन मुले तसेच त्यांच्या वडिलांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश मिळाले आहे.ढिगारा हटवण्याचे काम बचाव पथकाकडून केले जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news