नॉर्वे बॉलिवूड फिल्म फेस्टिव्हल : मराठमोळा ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमाचा डंका | पुढारी

नॉर्वे बॉलिवूड फिल्म फेस्टिव्हल : मराठमोळा 'मीडियम स्पाइसी' सिनेमाचा डंका

पुढारी ऑनलाईन : बहुप्रतिक्षित मराठी सिनेमा ‘मीडियम स्पाइसी’ नॉर्वे बॉलिवूड महोत्सवात प्रदर्शित होणार आहे. गेले १९ वर्षे हा बॉलिवूड महोत्सव साजरा केला जातो. यंदा ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमाचे वर्ल्ड प्रीमियर नॉर्वेमध्ये होणार आहे. ‌भारतात साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी, या सिनेमाचे मुख्यतः पुण्यात आणि मुंबईतील काही ठिकाणी चित्रीकरण झाले.

मोहित टाकळकर दिग्दर्शित हा सिनेमा शहरी जीवनातील नातेसंबंधावर प्रकाश टाकणारा आहे.

यात सई ताम्हणकर, ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

सागर देशमुख, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, इप्शिता यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ज्येष्ठ कलाकार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

लॅन्डमार्क फिल्म्सच्या निर्मात्या विधि कासलीवाल म्हणतात.- “आम्ही प्रेक्षकांसाठी सिनेमा प्रदर्शित करण्याची वाट पाहत होतो.

तर, आता नॉर्वेमध्ये या चित्रपटाचे पहिले स्क्रीनिंग करण्यास आम्ही उत्सुक आहोत. खरंतरं, कलेला सीमा नसतात. तसंच चित्रपट महोत्सव आपल्याला चित्रपटांद्वारे आपल्या कथा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत नेण्याची संधी देतात.”

medium spicy
medium spicy

आमचा सिनेमा साता समुद्रापार चालला आहे

मोहित टाकळकर म्हणतात, “एक दिग्दर्शक म्हणून, आमचा सिनेमा साता समुद्रापार चालला आहे. हे बघून अत्यंत समाधान वाटतं. खरंतर जेव्हा आम्ही हा सिनेमा बनवला.

तेव्हा या सिनेमाने त्याच्या प्रेक्षकांसाठी जास्तीत जास्त ठिकाणी प्रवास करावा. अशी आमची इच्छा होती‌. माझ्या सिनेमाच्या टिमला आणि निर्मात्यांना आशा आहे. ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमा महोत्सवात चांगलाच स्वाद आणेल ! ”

नॉर्वे बॉलिवूड फेस्टिव्हल हा अनेक प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे.

या महोत्सवात सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट आणि मनोरंजन उद्योगातील कलाकारांना त्यांच्या अद्भुत योगदानाबद्दल सन्मानित करतात.

याआधीच्या महोत्सवात सलमान खान, विद्या बालन, हेमा मालिनी, अनिल कपूर, डेव्हिड धवन, मधुर भांडारकर आणि बोमन इराणीसारख्या काही कलाकारांनी हजेरी लावली होती.

हेही वाचलं का? 

 

 

Back to top button