पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस-१६ मध्ये यावेळी सर्वात शॉकिंग एलिमिनेशन झालं होतं. (Bigg Boss 16 Elimination) घरच्यांनी मिळून अंकित गुप्ताला बाहेरचा रस्ता दाखवला. अंकित गुप्ताला प्रियांका चाहर चौधरीने नॉमिनेशनपासून वाचवलं. परंतु, जेव्हा घरच्यांना विचारण्यात आले की, कमी ॲक्टिव्ह सदस्य कोण आहे, तेव्हा घरातील खूप साऱ्या सदस्यांना एका सुरात अंकित गुप्ताचं नाव घेतलं. याप्रकारे तो घरातून बेघर झाला. (Bigg Boss 16 Elimination)
अंकितच्या घरातून बाहेर जाण्याच्या वृत्ताने प्रियांकाचं वाईट हाल झाले. ती रडू लागली, आरडाओरडा करु लागली. शोच्या नव्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं की, कशाप्रकारे घरच्यांनीदेखील प्रियांकाला समजवण्यासाठी खूप प्रयत्न केला. पण, ती ऐकायला तयार नव्हती. अंकित आणि प्रियांका इतक्या दिवसांपर्यंत दोघे एकत्र राहत होते.
अंकित आता सरगून मेहता आणि रवी दुबेच्या नव्या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेचा टेलीकास्ट लवकरचं कलर्स चॅनेलवर दिसणार आहे. याचं सीरियलच्या प्रोमो शूटसाठी अंकितला घराबाहेर पाठवल्याची माहिती समोर आलीय.
वीकेंड का वारमध्ये सलमान खानने प्रियांका चाहर चौधरीला फटकारलं. तिने अंकितला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केला. सलमानने तिला म्हटलं की, तू जे करतेस ते खरं आणि दुसऱ्या कुणी केलं तर प्रश्न उपस्थित करतेस. यावर प्रियांका उत्तर देताना म्हणते की, मी इतक्या चांगल्या मित्राला कशी जाऊ दिलं असतं. प्रियांकाच्या तमाम प्रयत्नानंतर अंकित शोमधून निघून गेला.