पुढारी ऑनलाईन डेस्क : रोहित शेट्टीचा चित्रपट 'सर्कस'ला बॉक्स ऑफिसवर मोठा फटका बसला आहे. या चित्रपटाची चर्चा तर झालीच.(Cirkus Collection ) पण, पहिल्याच दिवशी चित्रपटगृहात प्रेक्षक आले नसल्याने शो रद्द करावा लागला. सिंगल स्क्रीन ते मल्टीप्लेक्सपर्यंत अनेक जागी हा शो रद्द करावा लागला. (Cirkus Collection)
रणवीर सिंह, पूजा हेगडे आणि जॅकलीन फर्नांडिसच्या मुख्य भूमिकेतील या चित्रपटाला सोशल मीडियावर काही खास प्रतिक्रिया मिळाली नाही. रोहित शेट्टीचा कोणताही चित्रपट असो कधीही फ्लॉप होत नाही. पण, दुर्देवाने यंदा त्याचा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली नाही. मुंबई आणि गुजरातसारख्या जागी कमीत कमी प्रेक्षकांसोबत हे शो सुरु होते.
सर्कसची ओपनिंग डे कलेक्शनची गोष्ट कराल तर एका हिंदी चित्रपटानुसार, पहिल्या दिवशी ६.३५ ते ७.३५ कोटींच्या मध्ये बिझनेस केला आहे. सर्कसची सुरुवात कमीत कमी १५ कोटी होईल, असे वाटत होते. चित्रपटात कलाकारांची संख्याही मोठी आहे.
ख्रिसमसच्या निमित्ताने रिलीज झालेल्या सर्कसला पहिल्या दिवशी थंड प्रतिसाद मिळालाय. सणाच्या पार्श्वभूमीवर रिलीज करून देखील काही फायदा झाला नाही. कहाणीमध्ये दम नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. यावर्षी होळीच्या निमित्ताने रिलीज झालेला चित्रपट बच्चन पांडे, रक्षाबंधनवर रिलीज झालेला रक्षाबंधन आणि लाल सिंह चड्ढा तसेच रणवीर सिंहचा जयेशभाई जोरदार आणि आता सर्कस बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आहे.
हेदेखील वाचा-