Bheemla Nayak : साऊथ स्टार Pawan Kalyan कोण आहे? जाणून घ्या

Pawan Kalyan
Pawan Kalyan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

यंदा 'भीमला नायक' (Bheemla Nayak) चित्रपट रिलीज होण्याच्या ४ दिवस आधी निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला. हा चित्रपट २५ फेब्रुवारी, २०२२ रोजी चित्रपटगृहात रिलीज केला जाईल. या चित्रपटात पवन कल्याण या साऊथ स्टारची मुख्य भूमिका आहे. तो एका दबंग पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असेल. (Bheemla Nayak) तुम्हाला माहिती आहे का हा साऊथ स्टार पवन कल्याण (Pawan Kalyan) कोण आहे? त्याच्याविषयी या गोष्टी जाणून घ्या.

साऊथ सुपरस्टार अभिनेता पवन कल्याण आगामी चित्रपट 'भीमला नायक'मुळे चर्चेत होता. या चित्रपटाचे पोस्टर काही दिवस आधी जारी करण्यात आला होता. रिलीजच्या आधी या चित्रपटाचा ट्रेलर जारी करण्यात आला. या चित्रपटामध्ये पवन कल्याण प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असेल.

तसेच राणा दग्गुबाती या स्टारचीदेखील महत्त्वाची भूमिका आहे. तो एका खलनायकाच्या भूमिकेत दिसेल. तो पवनच्या मार्गात अडथळा बनून उभा राहणार आहे. दोघांच्या मध्ये एकमेकांना मात देण्याची कहाणी भीमला नायकमध्ये दिसेल. या ट्रेलरमध्ये राणा दग्गुबातीने आपल्या स्क्रीन प्रेझेन्सने सर्वांवर प्रभाव टाकला आहे.

राणा दग्गुबातीची भूमिका डॅनियल शेखर आहे. तो एका बाहुबलीच्या भूमिकेत दिसेल. पवन कल्याण आणि राणा दग्गुबाती यांच्यात ईगो क्लॅश देखील पाहायला मिळेल. दोघांच्यात ॲक्शन सीन्सदेखील असणार आहेत. ट्रेलरच्या शेवटी हे सीन्स असणार आहेत.

कोण आहे पवन कल्याण?

२ सप्टेंबर, १९७१ रोजी पवनचा जन्म झाला. पवन कल्याण एक राजकीय नेता आहे. तो साऊथ मेगास्टार चिरंजीवीचा लहान भाऊ आहे. पवनचं खरं नाव कोन्निडेला कल्याण बाबू आहे. त्याला साऊथ सिनेमामध्ये पॉवर स्टार म्हणून ओळखलं जातं. 'गोकुलामलो सीता', 'बद्री', 'जॉनी', 'अन्नावरम', 'पुली', 'गब्बर सिंह' यासारखे हिट चित्रपट त्याने दिले आहेत. १९९६ मध्ये पवनने तेलुगु चित्रपट Akkada Ammayi Ikkada Abbayi मधून चित्रपट इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. यानंतर त्याने १९ वर्षांची नंदिनी नावाच्या तरूणीशी मे १९९७ मध्ये लग्नगाठ बांधली.

१६ वर्षात तीन लग्ने

पवन कल्याण राजकारणासोबत बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. तो एक दिग्दर्शक, गायक आणि स्क्रीन रायटरदेखील आहे. पवन आपल्या चित्रपट करिअरमध्ये राजकारणावरून चर्चेत राहतो. तो आपल्या खासगी आयुष्यावरूनही चर्चेत राहिला आहे.

पवनचं खासगी आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. त्याने १६ वर्षांमध्ये ३ लग्ने केली. त्याच्या पहिल्या पत्नीचं नाव नंदिनी होतं. त्यांचं १९९७ मध्ये लग्न झालं होतं. नंतर १९९९ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.

यानंतर पवनच्या आयुष्यात रेणू देसाई आली. दोघांनी लग्न केलं. पण, त्यांचं लग्न टिकू शकलं नाही. त्यांना मुलगा अकीरा आणि मुलगी आध्या आहे. लग्नाच्या तीन वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेतला. अभिनेता ते राजकीय नेता झालेल्या पवन कल्याणने तिसरं लग्न एका रशियन मॉडेलशी केलं होतं. अन्ना लेजनेवा असं तिचं नाव होतं. दोघांची भेट २०११ मध्ये झाली होती. दोघांनी लग्न केलं. त्यांना एक मुलगा मार्क शंकर पवनोविच आहे.

आपला भाऊ चिरंजीवी प्रमाणे पवनने राजकारणातही पाऊल ठेवलं. २००८ मध्ये तो प्रजा राज्यम पक्षात गेला. काही वर्षानंतर त्याने आपला पक्ष जन सेना स्थापन केला.

या दिवशी रिलीज होणार चित्रपट

यावेळी निर्मात्यांनी एक वेगळी स्ट्रॅटजी अलवंबली आहे. त्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर चार दिवस आधी रिलीज करण्यात आला. हा चित्रपट २५ फेब्रुवारी, २०२२ रोजी चित्रपटगृहात रिलीज करण्यात येणार आहे. त्याचसोबत नित्या मेनन आणि संयुक्तादेखील दिसणार आहेत. हा चित्रपट सागर के चंद्र दिग्दर्शित करणार आहेत. स्क्रीनप्ले, डायलॉग त्रिविक्रम यांनी लिहिले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pawan Kalyan (@pawankalyan.k)

 

View this post on Instagram

 

A post shared by Pawan Kalyan (@pawankalyan.k)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news