बंगळूर : पुढारी वृत्तसेवा हिजाब परिधान करण्याची परवानगी देण्याची मागणी करुन उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर याच आठवड्यात निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे त्रिसदस्यीय खंडपीठाने जाहीर केले आहे.
बेळगाव : सीईटीची तारीख लवकरच, १५ हजार शिक्षकांची भरती होणार मुख्य न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे या प्रकरणी नियमित सुनावणी सुरु आहे. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी हिजाब परिधान करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली. याआधी न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशामध्ये काही प्रमाणात सवलत देण्याची मागणी केली. त्यानंतर खंडपीठाने या आठवड्यातच निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले.