‘अंबादास दानवे यांनी मराठा असताना ओबीसी प्रमाणपत्र घेतले’

‘अंबादास दानवे यांनी मराठा असताना ओबीसी प्रमाणपत्र घेतले’
Published on
Updated on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी देखील मराठा असताना ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ओबीसी बैठक हा एक फार्स असून गेल्या पाच वर्षात मराठा समाजाच्या किमान २८ लाख लोकांना मराठवाड्यात गुपचूप सरसकट ओबीसी प्रमाणपत्रांचे गैरमार्गाने वाटप झाल्याचा गंभीर आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहे.

संबंधित बातम्या : 

गेल्या दीड-दोन वर्षात यातील निम्मे प्रमाणपत्रांचे गतीने काम झाले, याविषयी एसआयटी चौकशी करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. अंबादास दानवे मराठा असताना ओबीसी प्रमाणपत्र घेतले आहे. अशा प्रकारे सुमारे २८ लाख लोकांना पैसे देऊन ओबीसी प्रमाणपत्राचा लाभ देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. एकीकडे सरकार जनतेला मराठा-ओबीसी असे आपसात झुंजवत ठेवते आणि दुसरीकडे गुपचुपपणे सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटण्याचे काम करत आहे. या प्रकरणी श्वेतपत्रिका काढण्याची गरज आहे. विशेषतः बोगस ओबीसी प्रमाणपत्र मिळवून नोकऱ्या लाटणाऱ्यांची एसआयटी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news