नागपूर; पुढारी वृत्तसेवा : संविधान चौकात आज (दि. २३) साखळी उपोषणाच्या १४ व्या दिवशी, राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थ्यी महासंघातर्फे, ओबीसी विद्यार्थ्यांना ७२ वसतीगृह मिळालेच पाहिजे, तसेच मराठ्यांना कुणब्याचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये या दोन मागण्या रक्ताने लिहुन मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांना मेलने पाठविण्यात आल्या. चंद्रपूर येथे अन्नत्याग आंदोलन करणारे रवींद्र टोंगे यांच्या समर्थनार्थ हे पत्र पाठविल्याचे सांगितले. या आंदोलनात विद्यार्थी नेते रुषभ राऊत, निलेश कोढे, विनोद हजारे, श्रीकांत मसमारे,रुतिका डाळ मसमारे, शुभम वाघमारे, रीतेश कढव, पराग वानखेडे,यश हजारे,राजु मोहोड,खुशी ईरुगकर, खुशबू घारपुरे, हिमाशी दियेवार, आचल पेंदाम, नयन भिवगडे आदी विद्यार्थी हजर होते. ओबीसी महासंघ अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. (OBC Reservation)
आज मंडपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते जिप सदस्य सलील देशमुख यांनी भेट देऊन ओबीसीच्या सर्व संवैधानिक मागण्यांचे समर्थन केले. आज साखळी उपोषणाला सो.क्ष. कासार समाजाचे शरदराव भांडेकर,,अशोक धोटे, अनिल नागपूरकर यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाला पाठिंबा दिला. (OBC Reservation)
या साखळी उपोषणात डॉ दिलीप बारहाते, अँड प्रविण डेहनकर, डॉ अनंत बरडे, हेमंत गावंडे,केशव शास्त्री, पांडुरंग शिंगणे, वसंत राऊत, दौलत शास्त्री, भाऊराव कापसे, नारायण मांगे, अशोक चिंचे, अँड घनश्याम मांगे, शरद वानखेडे, सुभाष घाटे, डॉ अरुण वराडे, निलेश कोढे, पराग वानखेडे, डॉ राजीव गोसावी असे १९ जण आज सहभागी झाले. या आंदोलनाला आतापर्यंत ४० संघटनांनी पाठिंबा दिला आहे.