तुरुंगात असताना भुजबळ पवारांना ब्लॅकमेल करायचे

तुरुंगात असताना भुजबळ पवारांना ब्लॅकमेल करायचे
Published on
Updated on

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : जेलमध्ये असतानाचे आणि आताचे छगन भुजबळ यांच्यात खूप फरक आहे. जामिनासाठी त्यांची धडपड सुरू होती. जामीन झाला नाही तर मला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा देत ते राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांना यांना ब्लॅकमेल करत असत, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांनी केला आहे.

संबंधित बातम्या : 

कदम यांनी माध्यमांशी बोलताना हा आरोप केला. अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील भ्रष्टाचार प्रकरणी कदम सात वर्षांहून अधिक काळ तुरुंगात होते. त्यांची नुकतीच जामिनावर सुटका झाली आहे. भुजबळ आणि ते काही काळ जेलमध्ये एकत्र होते.

कदम म्हणाले, छगन भुजबळ तुरुंगात असताना माझी आणि त्यांची भेट होत असे. त्यावेळी पवार यांनी मला मदत केली पाहिजे. माझ्या जामिनाला खूप उशीर होत आहे, अशी नाराजी ते व्यक्त करत. तसेच वेगळा मार्ग स्वीकारण्याची धमकीही ते पवारांना देत.

सत्तेत असतानाचे आणि तुरुंगातील भुजबळ यांच्यात जमीन आस्मानचा फरक आहे. जेलमध्ये ते सारखे आजारी पडायचे, त्यांच्या छातीत दुखत असे, त्यांना सारखी उपचाराची गरज लागायची. मात्र बाहेर आल्यापासून त्यांच्या छातीत दुखत असल्याची एकही बातमी आम्ही ऐकली नाही, असा टोलाही कदम यांनी लगावला. तुरुंगवास कुणाच्याही नशिबात येऊ नये, तुरुंगवास म्हणजे नरक आहे, असे कदम म्हणाले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news