तहसीलदार, नायब तहसीलदारांची कंत्राटी भरती | पुढारी

तहसीलदार, नायब तहसीलदारांची कंत्राटी भरती

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : सरकारी खात्यांत नोकर्‍या मिळाव्यात, यासाठी विविध सामाजिक संघटना आरक्षणाची मागणी करत असताना राज्य सरकारने आता कंत्राटी तत्त्वावर कर्मचार्‍यांची खुलेआम भरती सुरू केली आहे. 75 हजार पदांच्या कंत्राटी मेगाभरतीसाठी ठेकेदार नियुक्तीच्या आदेशाची शाई सुकायच्या आधीच जळगाव जिल्हाधिकार्‍यांनी आता कंत्राटी तत्त्वावर तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, संगणक चालक आणि शिपाई भरतीची जाहिरात दिली आहे.

संबंधित बातम्या : 

सरकारच्या या धोरणावरून राज्यात आता टप्प्याटप्प्याने कंत्राटी नोकरभरती केली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सामाजिक आरक्षणाला धोका निर्माण झाला आहे. या धोरणाला राज्यातील कर्मचारी-अधिकारी संघटना आणि सामाजिक व राजकीय संघटनांनी कडाडून विरोध केला आहे.

या पदांसाठी दिली जाहिरात

– लवाद (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण) तथा जिल्हाधिकारी, जळगाव
– सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जळगाव भाग
– सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भुसावळ
– सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अंमळनेर
– सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा
– सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी चाळीसगाव यांच्या कार्यालयात पदे.

हेही वाचा : 

Back to top button