पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांची पाकिस्तानी मैत्रीण अरुसा आलम म्हणाली, नात्याचा मला अभिमान

पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांची पाकिस्तानी मैत्रीण अरुसा आलम म्हणाली, नात्याचा मला अभिमान

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची पाकिस्तानी मैत्रीण अरुसा आलम यांनी दोघांच्या नात्याबाबत खुलासा केला आहे. आमच्या नात्याचा मला अभिमान आहे, असे प्रत्युत्तर त्‍यांनी विरोधकांना दिले आहे.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे पाकिस्तानी मैत्रीण अरुसा आलम हिच्यामुळे अडचणीत आले आहेत. अमरिंदर सिंग मुख्यमंत्री पदावर असताना शासकीय निवासस्थानी साडेचार वर्षे राहिल्याने त्या प्रकरणाची आता चौकशी करण्यात येणार आहे. पाकिस्तानी गुप्तहेर संस्था 'आयएसआय'शी अरुसा आलम यांचा संबंध आहे, असा दावा विरोधकांनी केला आहे.

या प्रकरणामूळे पंजाबच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.  माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पाकिस्तानी मैत्रिणी अरुसा आलम पाकिस्तानी गुप्तहेर संस्था 'आयएसआय'शी संबंध आहे असा दावा करत या गंभीर प्रकरणाची चौकशी करणार असल्‍याचे पंजाबचे गृहमंत्री सुखजिंदरसिंग रंधावा यांनी

या आरोपाला अरुसा आलम यांनी यांनी फ्री प्रेस जर्नलशी बोलताना प्रत्युतर दिले, "कॅप्टन अमरिंदर सिंग आणि माझ्या नात्याचा मला अभिमान आहे, आमचं नातं जिवाळ्याचे आणि माणुसकीचे आहे. या नात्याला वेगळे वळण देणारे, लोक कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या जवळही  जावू शकत नाहीत.

RAW ने ( Research and Analysis Wing) माझी आणि माझ्या कामाची तपासणी केली आहे. तपासणी अंती माझी रॉ आणि आंतरराष्ट्रीय गुप्तचर संस्थांनी आरोपातून मुक्त केले आहे," असेही अरुसा आलम फ्री प्रेस जर्नलशी बोलताना म्हणाल्या.

ज्या लोकांनी माझी खोटी माहिती आणि फोटो प्रसिद्ध केले त्या मीडिया हाऊस आणि राजकीय व्यक्तिमत्वावर मानहानीचा दावा दाखल करणार आहे. मानहानीच्या याचिका दाखल करण्याचा अधिकार माझ्याकडे आहे. माझ्यावर झालेल्या खोट्या आरोपांसंबधीत न्याय मागण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाऊ शकते, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी त्यांनी कॉंग्रेसवरही टीका केली, दरम्यान, अमरिंदर यांच्यामूळे जी लोक राजकारणात मोठी झाली त्याच लोकांनी  सहकाऱ्यांनी ज्या प्रकारे त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवले.

पहा व्हिडिओ 

पोटासाठी नाचतो मी पर्वा कुणाची? पुरूष लावणी कलावंताची कहाणी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news