IND vs PAK : ..आणि पाकिस्तानी खेळाडू धोनी, धोनी म्हणून ओरडू लागला! ( Video ) | पुढारी

IND vs PAK : ..आणि पाकिस्तानी खेळाडू धोनी, धोनी म्हणून ओरडू लागला! ( Video )

पुढारी ऑनलाईन डेस्क

IND vs PAK :  भारत आणि पाकिस्तान यांच्यात उद्या २४ ऑक्टेबरला हाय व्होल्टेज सामना होणार आहे. दरम्यान या सामन्याकडे भारतासह जगाचे लक्ष लागून राहिले आहे. भारत आणि पाकिस्तान दोन्ही टीमचे खेळाडू कसून सराव करताना दिसत आहेत. या सरावादरम्यानच पाकिस्तानचा गोलंदाज शहानवाज दहानीने महेंद्रसिंह धोनी सोमरुन जात असताना पाहिले आणि तो त्याला उत्साहात हाका मारू लागला.

या दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ भारताचा मेंटोर महेंद्रसिंग धोनी आणि पाकिस्तानचा खेळाडू युवा गोलंदाज शहानवाज दहानी यांच्यातील संभाषणाचा आहे.

महेंद्रसिंग धोनी सराव संपवून हॉटेलकडे जात होता. हॉटेलमध्ये जाण्याच्या मार्गावर पाकिस्तानी संघातील काही खेळाडू सराव करत होते. दरम्यान शहानवाज दहानीचे लक्ष धोनीकडे गेल्यावर त्याने थेट धोनीला हाक मारली. तो धोनीला पाहताच आश्चर्यचकीत झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

IND vs PAK :  व्हिडीओ पाहून चाहतेही खुश

भारताचा मेंटोर धोनीशी बोलण्यासाठी पाकिस्तानचा युवा गोलंदाज शाहनवाज दहानीही उत्सुक झाला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, दहानी धोनीशी बोलण्याचा प्रयत्न करतो, यावर धोनीनेही त्याला प्रतिसाद दिल्याने दहानी एकदम खुश दिसला. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनाही याबाबत उत्सुकता वाटत आहे.

धोनीशी बोलत असताना पाकिस्तानचा गोलंदाज शाहनवाजने पहिल्यांदा स्वतःची ओळख करून दिली. दहानी धोनीला म्हणाला, ‘तू धोनी आहेस, मी दहानी आहे.’ यावर धोनीने मान हलवत आपली प्रतिक्रिया दिली.

दहानीने आतापर्यंत पाकिस्तान संघासाठी आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही, परंतु देशांतर्गत टी -20 मध्ये त्याने २९ विकेट्स घेण्यात यश मिळवले आहे. याशिवाय त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये ६ सामन्यात ५ विकेट्स घेतल्या आहेत. दहानी पाकिस्तानी सुपर लीगमध्ये मुल्तान सुल्तान्स संघाकडून खेळतो.

संभाव्य भारतीय संघ

विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी; राखीव खेळाडू – श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर व दीपक चहर.

पाकिस्तानचा संघ

बाबर आझम, आसीफ अली, खुशदील शाह, मोहम्मद हाफिज, सोहैब मक्सूद, आझम खान, मोहम्मद रिझवान, इमाद वासीम, मोहम्मद नवाझ, मोहम्मद वासीम, शाबाद खान, हॅरीस रौफ, हसन अली, मोहम्मद हस्नैन, शाहिन शाह आफ्रिदी.

Back to top button