Lakhimpur Kheri Violence: मुख्‍य संशयित आशीष मिश्राला डेंग्‍यूची लागण ? - पुढारी

Lakhimpur Kheri Violence: मुख्‍य संशयित आशीष मिश्राला डेंग्‍यूची लागण ?

लखीमपूर खेरी : पुढारी ऑनलाईन

लखीमपूर खेरीप्रकरणातील ( Lakhimpur Kheri Violence: ) मुख्‍य संशयित आरोपी आशीष मिश्रा याची तब्‍येत बिघडली आहे. त्‍याला रुग्‍णालयात दाखल केले आहे. त्‍याला डेंग्‍यूची लागण झाली असावी, अशी शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे.

केंद्रीय गृहराज्‍य मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा हा आशीष मिश्रा याला ताप आला आहे. डेंग्‍यूची लक्षणे आढळल्‍यामुळे त्‍याला सरकारी रुग्‍णालयात दाखल केले आहे. रक्‍ताच्‍या तपासणीनंतरच त्‍याला डेंग्‍यू झाला आहे का, याबाबतची पुष्‍टी होईल, अशी माहिती लखीमपूर खेरी जिल्‍हा कारागृहाचे अधीक्षक पीपी सिंह यांनी सांगितले.

( Lakhimpur Kheri Violence: ) आतापर्यंत १३ जणांना अटक

३ ऑक्‍टोबर २०२१ लखीमपूर खेरी ( Lakhimpur Kheri Violence: ) येथे शेतकर्‍यांनी केंद्र सरकारच्‍या कायद्‍याविरोधात आंदोलन केले होते. यावेळी आंदोलक शेतकर्‍यांना गाडीने चिरडण्‍यात आले. यामध्‍ये चार शेतकरी, दोन भाजप कार्यकर्ते, गाडीचा चालक आणि एका पत्रकार यांचा मृत्‍यू झाला  हाेता. याप्रकरणातील मुख्‍य आरोपी केंद्रीय गृहराज्‍य मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा हा आशीष मिश्रा याच्‍यासह १३ जणांना अटक करण्‍यात आली आहे.

आशीष मिश्रा याला शुक्रवार २२ ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्‍यात आली होती. त्‍याच्‍या जामीन अर्जावर २८ ऑक्‍टोबर रोजी सुनावणी होणार असल्‍याची माहिती आशीष मिश्रा याच्‍या वकिलांनी दिली.

हेही वाचलं का?

 

 

Back to top button