Allu Arjun : अल्लू अर्जुनला म्हटलं ‘वडा पाव’, वाढलेलं वजन पाहून केलं ट्रोल

allu arjun
allu arjun

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथची सुपरस्टार अल्लू अर्जुनला (Allu Arjun) त्याचा चित्रपट 'पुष्पा: द राईज'ने नॅशनल हीरो बनवलंय. या चित्रपटामध्ये पुष्पाची स्टाईल आणि बोलण्याचा अंदाजाने सर्वांनाच घायाळ केलं आहे. पुष्पाच्या भूमिकेत अल्लू अर्जुनच्या डान्स स्टाईलपर्यंत नॅशनल क्रेझ बनवलं गेलं. असं कुणीतरीचं असावं की, ज्याने अल्लू अर्जुनला निगेटिव्ह कॉमेंट केलं असावं. अल्लू अर्जुनचा लेटेस्ट फोटो व्हायरल होताचं, काही नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करणं सुरू केलं. या फोटोंमध्ये त्याच्या वाढलेल्या वजनामुळे तो निशाण्यावर आलाय. बॉडी शेमिंग करताना अल्लू अर्जुनला निगेटिव्ह कमेंट्सदेखील दिले. (Allu Arjun)

अल्लू स्पॉट झाल्यावर, तो खूपचं लठ्ठ दिसला होता. त्याचं वजन खूप वाढलं होतं. अल्लू अर्जुन सध्या 'पुष्पा २'चे शूटिंग करत असल्याचे म्हटले जात आहे. अल्लू अर्जुन निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या पँटमध्ये स्पॉट झालाय, तो त्याच्या लठ्ठपणामुळे लक्ष्य केलं आहे.

कोणी अल्लू अर्जुनला 'म्हातारा' तर कोणी 'वडा पाव' म्हटलं. एका युजरने तर मर्यादा ओलांडत 'ये तो रोड छाप चोर है और साऊथचे लोक या भिकाऱ्याचे वेडे झाले आहेत' अशी कमेंट केली. त्याचबरोबर अनेक युजर्सनी अल्लू अर्जुनला 'मोटा भाई' म्हटले. अल्लू अर्जुनचे वाढलेले वजन पाहून सगळेच हैराण झाले आहेत. आता 'पुष्पा २: द रुल'मुळे त्याचे वजन खरेच वाढले आहे की आणखी काही कारण आहे, हे येणारा काळच समजेल.

अल्लू अर्जुन 'पुष्पा 2: द रुल'मध्ये दिसणार आहे. करिअरबद्दल बोलायचे झाले तर अल्लू अर्जुन शेवटचा 'पुष्पा: द राइज'मध्ये दिसला होता. सुकमार दिग्दर्शित हा चित्रपट १७ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना आणि प्रकाश राज यांच्याही भूमिका होत्या. पुष्पा तेलुगू व्यतिरिक्त मल्याळम, हिंदी, तमिळ आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज झाला. आता तो 'पुष्पा २: द रुल'मध्ये दिसणार आहे.

हेदेखील वाचा –

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

video-  manav.manglani insta वरून साभार

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news