क्रिती सेननला आवडतो व्यायाम | पुढारी

क्रिती सेननला आवडतो व्यायाम

मुंबई ः बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनन नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती नेहमीच फॅन्सना फिटनेस रूटीनबद्दल सांगत असते. याशिवाय ती चाहत्यांना फिटनेससाठी व्यायाम आणि योगा करण्यासाठी प्रोत्साहित करत असते. नेहमी व्यायामाबद्दल प्रेम व्यक्‍त करणार्‍या क्रितीने यावेळी तिला न आवडणार्‍या व्यायामाच्या प्रकारांबद्दल सांगितले आहे.

‘मिमी’मधील भूमिकेसाठी क्रितीने 15 किलोने आपले वजन वाढविले होते. वाढलेले वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना सुरुवात केली आणि यासंबंधीचे प्रसंग क्रितीने चाहत्यांसोबत शेअर केले. यावेळी तिने सांगितले की, मला ऑस्ट्रेलियन पुल्स, बारबेल बॅक स्क्‍वैट्स, जॉगिंग आणि हँगिंग नी ट्रॅक्स हे व्यायामाचे प्रकार मला आवडत नाहीत. मला हे आवडत नसले तरी मी ते करत असते. कारण, मला ते करताना अडचणी येतात.

Back to top button