Mrunal Thakur : मृणालने फ्लॉन्ट केली टोन्ड बॉडी, दिलकश अवताराने चर्चेत | पुढारी

Mrunal Thakur : मृणालने फ्लॉन्ट केली टोन्ड बॉडी, दिलकश अवताराने चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या तिच्या ग्लॅमरस आणि बिकिनी फोटोंमुळे चर्चेत आहे. अलीकडेच तिने एक (Mrunal Thakur) बिकिनी फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिची टोन्ड बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहे. हे फोटो पाहून चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये तिचे खूप कौतुक केले. कुणी म्हटलं की तू अप्रतिम दिसत आहेस, तर कुणी म्हटलं की आग लावतेस. जर्सी फेम अभिनेत्री मृणाल ठाकूर ही अशी अभिनेत्री आहे जिने आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीपासून केली होती आणि आज ती दक्षिणेपासून बॉलिवूडपर्यंत खूप काम करत आहे. (Mrunal Thakur)

मृणाल ठाकूरच्या करिअरबद्दल जाणून घेण्यापूर्वी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलूया. १ ऑगस्ट, १९९२ रोजी महाराष्ट्रात जन्मलेली मृणाल ठाकूर ही मुंबईतील शाळेत लहानाची मोठी झाली. तिने मास मीडियामध्ये शिक्षण घेतले.

मृणाल ठाकूरला कॉलेजमध्येच एका टीव्ही मालिकेसाठी संपर्क करण्यात आला होता. स्टार प्लस मालिका ‘मुझसे कुछ कहते है ये खामोशियां’मध्ये गौरी भोसलेची मुख्य भूमिका साकारून ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. ही मालिका २०१२ मध्ये प्रसारित झाली होती.

‘कुमकुम भाग्य’मध्येही दिसली

२०१४ मध्ये, मृणाल ठाकूरला टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘कुमकुम भाग्य’साठी देखील साईन केले गेले होते. या मालिकेमध्ये तिने सृती झा, शब्बीर अहवालियासह अनेक स्टार्ससोबत काम केले होते. यानंतर ती नच बलिए ७ आणि सौभाग्य लक्ष्मी सारख्या शोमध्येही दिसली.

अभिनयात पदार्पण

अनेक वर्षे टीव्हीमध्ये काम केल्यानंतर मृणाल ठाकूर चित्रपटांकडे वळली. २०१४ साली विट्टी ठेंडू या मराठी चित्रपटातून तिनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

अशी प्रसिद्धी मिळाली

मृणाल ठाकूरला हृतिक रोशनच्या सुपर ३० चित्रपटातून ओळख मिळाली. यानंतर तिचा बॉलिवूड प्रवास सुरू झाला आणि ती सातत्याने चांगले काम करत आहे.

मोठे चित्रपट

मृणालने आतापर्यंत ‘बाटला हाऊस’, ‘घोस्ट स्टोरीज’, ‘तुफान’ आणि ‘धमाका’ ते ‘जर्सी’ यांसारख्या चित्रपटांतून स्वत:ला सिद्ध केले आहे.

घरी पोहोचल्यावर रडायचे

एका मुलाखतीत आपल्या कारकिर्दीबद्दल बोलताना मृणाल ठाकूर म्हणाली होती की, तिचा बॉलिवूडचा प्रवास सोपा नव्हता. या प्रवासात त्याला वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी वृत्ती पाहायला मिळाली. एक काळ असा होता की लोकांच्या वागण्याने ती कंटाळायची आणि घरी पोहोचल्यावर रडायची.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mrunal Thakur (@mrunalthakur)

 

View this post on Instagram

 

A post shared by Mrunal Thakur (@mrunalthakur)

Back to top button