पिंपरी :पाच वर्षांत शहरात वाढले तीन लाख मतदार | पुढारी

पिंपरी :पाच वर्षांत शहरात वाढले तीन लाख मतदार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहर लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे. शहरात नागरिकांची संख्या वाढीचा वेग अधिक आहे. त्यामुळे शहरात गेल्या पाच वर्षात प्रतिवर्षी 60 हजारांप्रमाणे तब्बल 3 लाख मतदार वाढले आहेत. फेबु्रवारी 2017 च्या निवडणुकीसाठी 11 लाख 91 हजार 59 मतदार होते. आता ती संख्या 14 लाख 88 हजार 129 झाली आहे.

फेब्रुवारी  2017 ला महापालिकेची सातवी निवडणूक झाली होती. चार सदस्यीय एकूण 32 प्रभाग होते. त्यावेळी शहरात एकूण 11 लाख 91 हजार 59 मतदार होते. मतदार संख्येत पाच वर्षात मोठी वाढ झाली आहे. दरवर्षी 60 हजार मतदार संख्या वाढत असल्याचे मतदार यादीवर स्पष्ट होत आहे.

सध्या शहराची लोकसंख्या 27 लाखांवर पोहचली आहे. भारत निवडणूक आयोगाकडे असलेल्या 31 मे 2022 पर्यंतच्या नोंदीनुसार पिंपरी-चिंचवडमध्ये 2 लाख 96 हजार 70 मतदारांची भर पडली आहे. त्यात पुरूष मतदार 8 लाख 394 तर, महिला मतदार 6 लाख 87 हजार 647 आहेत. तृतीयपंथी मतदार केवळ 88 आहेत.

अशी आहे शहराची लोकसंख्या

जनगणना वर्ष लोकसंख्या
1991 5 लाख 17 हजार
2001 10 लाख 6 हजार
2011 17 लाख 27 हजार
2021 27 लाख (अंदाजे)

मतदार संख्या व केंद्र
वर्ष मतदार केंद्र
2017 11,92,059 1,608
2022 14,88,129 2,000
विधानसभानिहाय मतदार
पिंपरी 3,76,470
चिंचवड 5,86,849
भोसरी 5,27,799
भोर (ताथवडे) 9,575

 

Back to top button