या मला अटक करा, माझी मान कापली तरी गुवाहाटीचा मार्ग स्वीकारणार नाही : संजय राऊत | पुढारी

या मला अटक करा, माझी मान कापली तरी गुवाहाटीचा मार्ग स्वीकारणार नाही : संजय राऊत

मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क : पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने खासदार संजय राऊत यांना समन्स बजावले असून उद्या सकाळी ११ वाजता चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानंतर राऊत यांनी ट्विटरवर एक ट्विट करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना टॅग केलं आहे. या मला अटक करा, माझी मान कापली तरी गुवाहाटीचा मार्ग स्वीकारणार नाही, असे खासदार संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

त्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे-मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे. छान, महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी..हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्वीकारणार नाही.या..मला अटक करा! जय महाराष्ट्र!

Back to top button