Drishyam 2 : बॉक्स ऑफिसवर ‘दृश्यम २’ ची जादू, जगभरात दमदार कमाई

Drishyam २ collection
Drishyam २ collection
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अजय देवगणचा चित्रपट दृश्यम २ ने बॉक्स ऑफिसवर भेडिया आणि ॲन ॲक्शन हिरोला मागे टाकले आहे. दृश्यम २ने जगभरात दमदार कमाई केली आहे. भारतात दुसऱ्या आठवड्यात चौथा सर्वात अधिक कमाई करणारा चित्रपट आहे. (Drishyam 2) 'दृश्यम २' च्या रिलीजला १५ दिवस पूर्ण झाले आहेत आणि या दिवसांमध्ये चित्रपटाने जगभरात जबरदस्त कमाई केली आहे. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात १०० कोटींहून अधिक कमाई केली. दुसऱ्या आठवड्यात देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चौथा क्रमांक ठरला आहे. सध्या अजय देवगणचा 'दृश्यम 2' बॉक्स ऑफिसवर चौकार आणि षटकार ठोकत आहे. (Drishyam 2)

दृष्यम २ चे आकर्षण

दिग्दर्शक अभिषेक पाठकचा 'दृश्यम 2' रिलीज होऊन १५ दिवस उलटूनही याची जादू अद्यापही कायम आहे. चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर १५.३८ कोटींचे खाते उघडले होते. पहिल्या आठवड्यात 'दृश्यम २'चे एकूण कलेक्शन १०४.६६ कोटी होते. त्यामुळे दुसऱ्या आठवड्यात हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर ५८.८२ कोटींची कमाई करून दुसऱ्या आठवड्यात चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट

'दृश्यम २'ने रिलीजच्या १५ व्या दिवशी जगभरात २४० कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जवळपास ४.२० कोटींची कमाई केली आहे. यासह चित्रपटाचे एकूण कलेक्शन १६७.६८ कोटींच्या आसपास पोहोचले आहे. पुढच्या परदेशाबद्दल बोलायचे तर, या चित्रपटाने या मार्केटमधून सुमारे ४२.१५ कोटींची कमाई केली आहे.

भेडिया आणि ॲन अॅक्शन हिरो

आता 'दृश्यम २' तिसऱ्या आठवड्यात दाखल झाला आहे. २५ नोव्हेंबरला रिलीज झालेला वरुण धवनचा 'भेडिया' आणि या शुक्रवारी रिलीज झालेला आयुष्मान खुरानाचा 'अ‍ॅन अॅक्शन हिरो' या दोघांनी मिळून अजय देवगणच्या चित्रपटालाही मागे टाकले आहे. 'दृश्यम २' अजूनही बॉक्स ऑफिसवर थांबलेला नाही. 'दृश्यम २' हा अजय देवगणच्या २०१५ मध्ये आलेल्या 'दृश्यम' चित्रपटाचा सिक्वेल आहे, ज्यामध्ये अजय देवगण व्यतिरिक्त तब्बू, अक्षय खन्ना आणि श्रिया सरन मुख्य भूमिकेत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news