कर्जतमध्ये 8 गावांच्या सरपंचपदासाठी 52 अर्ज | पुढारी

कर्जतमध्ये 8 गावांच्या सरपंचपदासाठी 52 अर्ज

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी 52, तर सदस्य पदांसाठी 314 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली. काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. ऑफलाईन अर्ज भरण्याची मुभा दिल्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयाच्या गोदामात उमेदवारांनी आणि त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. गर्दी जास्त असल्यामुळे उशिरापर्यंत उमेदवारी अर्ज घेण्याचे काम सुरू होते. तालुक्यातील आळसुंदे, कापरेवाडी, माळंगी, कवडाणे, कोपर्डी, मुळेवाडी, निंबे व बहिरोबावाडी या ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे.

जनतेतून सरपंच निवड होणार असल्यामुळे मोठी चुरस दिसून येत आहे. माळंगी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी नऊ, तर सदस्य पदासाठी 52 अर्ज दाखल आहेत, कवडानेच्या सरपंच पदासाठी पाच तर सदस्य पदासाठी 17 अर्ज आले आहेत. कोपर्डीच्या सरपंच पदासाठी पाच, तर सदस्यासाठी 60 अर्ज, मुळेवाडी सरपंच सहा, सदस्य 20, कापरेवाडी सरपंच 9, सदस्य 54, बहिरोबावाडी सरपंच पाच, सदस्य 38, निंबे सरपंच चार, सदस्य 19, आळसुंदे सरपंच 9, सदस्य 54 याप्रमाणे उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहे.

Back to top button