औरंगाबाद : पाचोड परिसरात अवकाळी पावसाचा फटका; पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल | पुढारी

औरंगाबाद : पाचोड परिसरात अवकाळी पावसाचा फटका; पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल

पाचोड, पुढारी वृत्तसेवा

ऐन हिवाळ्यात मेघगर्जनेसह गारांच्या अवकाळी पावसाने पाचोडसह परिसराला झोडपून काढले. या पावसाने काढणीला आलेल्या तूर, कापूस, हरभरा, गहू, कांदा आणि अन्य भाजीपाला या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे शेतकर्‍यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळलं आहे.

ठिकठिकाणी शेतशिवारात गारांचा खच जमल्याचे दिसून येत होते. वातावरणात अचानक गारवा निर्माण झाल्याने रब्बी हंगामातील पिकांना हा पाऊस पोषक ठरुन उत्पादनात वाढ होणार असल्याने, कोरडवाहू शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

पावसाचा जोर वाढल्याने शेती कामे खोळंबली. काही ठिकाणी शेती कामासाठी गेलेल्या शेतमजुरांना आपल्या जनावरांसह माघारी परतावे लागले. अचानक बदललेल्या वातावरणामुळे विविध पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

Back to top button