Weekly Horoscope | साप्‍ताहिक राशीभविष्‍य, १६ ते २२ जून २०२४ | पुढारी

Weekly Horoscope | साप्‍ताहिक राशीभविष्‍य, १६ ते २२ जून २०२४

हा सप्ताह मेष, वृषभ, सिंह, कन्या, मकर राशिगटाला उत्तम, तर कर्क, वृश्चिक, मीन राशिगटाला कनिष्ठ फलदायी राहील. महत्त्वाचे ग्रहयोग – दि. १७ बुध युती शुक्र, बुध केंद्र नेपच्यून, बुध षडाष्टक प्लूटो, शुक्र केंद्र नेपच्यून, दि. १८ शुक्र षडाष्टक प्लूटो, दि. २० – रवी केंद्र नेपच्यून, दि. २१ – बुध लाभ मंगळ, दि. २२ रवी षडाष्टक प्लूटो. वक्री ग्रह शनी, प्लूटो, अस्तंगत ग्रह – शुक्र.

मेष : कामाचे मार्केटिंग कराल

रवी, बुध, शुक्र ३ रे. आपल्या कामाचे मार्केटिंग कराल. नवीन कल्पना सुचतील. पोटाची तक्रार राहील. कायम स्वरूपाची चांगली नोकरी मिळेल. बिबाह जुळेल. मेष सप्ताहाच्या सुरुवातीला वाद टाळा. कामात यश मिळेल. सहजीवन लाभेल. इतरांचे सहकार्य लाभेल. एक-दोन दिवस सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. सप्ताहाच्या शेवटी मनोबल सुधारेल.

वृषभ : आर्थिक प्राप्ती चांगली

रवी, बुध, शुक्र रु २ रे. आर्थिक प्राप्ती चांगली; पण जेमतेम व कष्टाने होईल. अत्यावश्यक खर्च वाढेल. विपरीत घटनांतून लाभ संभवतो. परदेशगमन घडेल. प्रलोभने टाळा. अधिकार गाजवाल. सप्ताहाच्या सुरुवातीला संततीसुख लाभेल. धार्मिक कृत्ये कराल. कमी मोबदल्यात आव्हानात्मक कामे कराल. एक-दोन दिवस सहकायनि कामे होतील.

मिथून : व्यक्तिमत्त्व उठून दिसेल

रवी, बुध, शुक्र १ लें. व्यक्तिमत्त्व उठून दिसेल. प्रयत्लवादी राहाल. महत्त्वाकांक्षी राहाल. विवाह जुळेल. आर्थिक प्राप्ती चांगली राहील. बाहनसौख्य लाभेल. कायदेशीर बाबी सांभाळा. रागावर नियंत्रण ठेवा. सप्ताहाच्या सुरुवातीला घरगृहस्थीची संततीची काळजी कराल. शिक्षणासाठी आर्थिक तरतूद कराल. कष्ट जास्त व श्रेय कमी मिळेल.

कर्क : कायदेशीर बाबीसाठी खर्च

रवी, बुध, शुक्र १२ वे. कायदेशीर बाबी, अत्यावश्यक खर्च वाढेल, धंद्यात स्पर्धा जाणवेल. चैन कराल. आर्थिक प्राप्ती होईल. अधिकार नीट चालणार नाहीत. अस्थिरता जाणवते. विलंय, अडचणी, त्रास अनुभवाल. परदेशगमन घडेल. सप्ताहाच्या सुरुवातीला बशासाठी धावपळ होईल; पण एक-दोन दिवस थकवा जाणवेल. पुढाकार घ्याल. संततीसुख लाभेल.

सिंह : अनेक मार्गांनी लाभ होईल

रवी, बुध, शुक्र ११ वे. अनेक मार्गांनी अपेक्षित लाभ दिल होतील. गृहसौख्य लाभेल. भाग्यकारक अनुभव येईल. शारीरिक व्याधी जाणवेल. वैवाहिकसौख्य लाभेल. चांगल्या अधिकाराची नोकरी मिळेल. सप्ताहाच्या सुरुवातीला कुटुंबाच्या गरजा भागवाल. एक-दोन दिवस गाठीभेटी, प्रबास इ. साठी धावपळ होईल. सप्ताहाच्या शेवटी शिक्षण, संततीसाठी खर्च होईल.

कन्या : खरेदी-विक्री वाढेल

रवी, बुध, शुक्र १० वे. खरेदी-विक्री वाढेल. कर्माला भाग्याची साथ लाभेल. धंद्यात गुंतवणूक करताना या विचारपूर्वक करा. खर्च वाढेल. शारीरिक तक्रारीकडे लक्ष द्या. सावधगिरी बाळगून कामे करा. सप्ताहाच्या सुरुवातीला उत्साहाने कामे उरकाल. कुटुंबाच्या गरजा भागवाल. एक-दोन दिवस गाठीभेटी, प्रवास इ. साठी खूप धावपळीचे जातील.

तुळ : भाग्यकारक अनुभव येईल

रवी, बुध, शुक्र ९ वे. भाग्यकारक अनुभव येईल. मोठे आर्थिक लाभ होतील. शिक्षणात उच्च प्रतीचे यश मिळवाल. सामाजिक कार्यात सहभागी राहाल. कौटुंबिक तूळ खर्च जास्त होईल. सप्ताहाची सुरुवात खर्चिक होईल. रेंगाळलेली कामे एक-दोन दिवसांत पूर्ण कराल. कौटुंबिक गरजा भागवाल, सप्ताहाच्या शेवटी पराबाहेरील कामे उरकाल.

वृश्चिक : विपरीत घटनेतून लाभ

रवी, बुध, शुक्र ८ वे. . धंद्यात मंदीचे वातावरण राहील. विपरीत घटनेतून अचानक धनलाभ होईल. विवाह जुळेल. भाग्य बलवान राहील. प्रॉपर्टीची कामे होतील. सप्ताहाची सुरुवात आर्थिक लाभाने होईल. एक-दोन दिवस खर्याचे, कंटाळवाणे जातील. कामे रेंगाळली तरी एक-दोन दिवसांत ती पूर्ण कराल. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक गरजा भागवाल.

धनू : परदेशाशी संबंधित व्यापारात फायदा

रबी, बुध, शुक्र ७ वे. परदेशाशी संबंधित व्यापारातून फायदा होईल. भावनिक दडपण राहील. शैक्षणिक प्रगती होईल. श्रेय कमी मिळेल. घरगृहस्थीत बाद संभवतात. सप्ताहाच्या सुरवातीला सामाजिक कार्यातून लाभ होईल. आर्थिक मोबदला मिळेल. एक-दोन दिवस खर्चाचे, कंटाळवाणे जातील. रेंगाळलेली कामे सप्ताहाच्या शेवटी हाती घ्याल.

मकर : विपरीत घटनेतून लाभ

रवी, युध, शुक्र ६ थे. कमी श्रमात संधी लाभेल. विपरीत साकार घटनेतून लाभ संभवतो. विवाह जुळेल. प्रॉपर्टीची कामे होतील. नियोजित व निर्णायक कामात यश मिळेल. विलंब अडचणी, त्रास अनुभवाल. सप्ताहाच्या सुरुवातीला वरिष्ठांच्या सूचना पाळा. प्रबास घडेल. जोडीदाराच्या मदतीने कामे पूर्ण कराल. आर्थिक लाभ होतील. सप्ताहाच्या शेवट खर्च वाढेल. चिडचिड होईल.

कुंभ : मनाची कुचंबणा होईल

रवी, युध, शुक्र ५ वे. मनाची कुचंबणा होईल. प्रेमविवाहास मान्यता मिळेल. निर्णायक कामात यश मिळेल. धाडसी कुग्भ कृत्ये कराल. आर्थिक लाभासाठी खूप उलाढाली कराल. कुटुंबात मतभेद जाणवतील. विलंब, त्रास अनुभवाल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. कामात यश मिळेल. सामाजिक कामातून लाभ होईल. सप्ताहाच्या शेवटी आर्थिक मोबदला मिळेल.

मीन : घरगृहस्थीची काळजी

रवी, बुध, शुक्र ४ थे. घरगृहस्थीचे सुख मिळेल. पशुधन दोन मिळेल; पण अधूनमधून घरगृहस्थीची काळजी राहील. विलंब, अडचणी, त्रास अनुभवाल. अतिआत्मविश्वास संवेदनशील राहील. सप्ताहाच्या सुरुवातीला प्रवास घडेल. यश इतरांच्या सहकायनि मिळेल. एक-दोन दिवस सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. सप्ताहाच्या शेवटी कामाचे समाधान मिळेल.

Back to top button