आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | शनिवार, १५ जून २०२४ | पुढारी

आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | शनिवार, १५ जून २०२४

चिराग दारूवाला :

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष : तुमच्या योजना गुप्त ठेवा

श्रीगणेश म्‍हणतात की, आज घरातील काही शुभ कार्य पूर्ण करण्याची योजना असेल. यावेळी विद्यार्थी आणि तरुणांनी आपल्या अभ्यासाची आणि करिअरकडे अधिक लक्ष द्‍यावे. जवळची व्यक्ती विश्वासघात करू शकते. कामाच्या ठिकाणी सुरू दुर्लक्ष करू नका. तुमच्या योजना गुप्त ठेवा.

वृषभ : तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा

श्रीगणेश सांगतात की, तुम्‍ही कठोर परिश्रमाच्‍या जोरावर अनपेक्षित फायदे मिळवाल. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. आवडीच्या कामात थोडा वेळ व्‍यतित केल्‍याने तुम्हाला आराम मिळेल. मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्‍ये त्रास होईल; परंतु काम शांततेने पार पडेल. कामाच्या ठिकाणी काही समस्या असतील,पण त्याच वेळी प्रयत्नांनी निराकरण होईल.

मिथुन : र्थिक प्रश्‍ना संबंधी कामे वेळेवर पूर्ण करा

आज आर्थिक प्रश्‍ना संबंधी कामे वेळेवर पूर्ण करा. मत्सरामुळे लोक तुमच्याबद्दल अफवा पसरवू शकतात; पण याकडे दुर्लक्ष करून तुमच्या कामात व्यस्त राहा. व्यवसायाशी संबंधित नवीन माहिती मिळवणे देखील आवश्यक आहे, अशी सूचना श्रीगणेश करतात.

कर्क : गरजूंना मदत केल्याने तुम्हाला मनःशांती मिळेल

आज धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात वेळ व्‍यतित कराल. गरजूंना मदत केल्याने तुम्हाला मनःशांती मिळेल. समस्या सोडविताना नकारात्मक विचारांना थारा देऊ नका, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने व्यावसायिक कामे सुरळीत झाल्‍याने इतर कामांवर लक्ष केंद्रित करू शकाल.

सिंह: कर्ज घेताना विचारपूर्वक निर्णय घ्‍या

जवळच्या नातेवाइकांच्या आगमनाने घरात आनंदी वातावरण राहील. कर्ज घेताना विचारपूर्वक निर्णय घ्‍या. व्यावसायिक क्रियाकलापांमध्ये योग्य सुव्यवस्था राखणे आवश्यक आहे, असे श्रीगणेश म्‍हणतात. उच्च अधिकारी आणि प्रतिष्ठित लोकांशी असलेले संबंध तुमच्या व्यवसायाला लाभदायक ठरतील. जोडीदारासह कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

कन्या : पैशाशी संबंधित व्यवहारात सावधगिरी बाळगा

व्यक्तिमत्त्वाबद्दल अधिक जागरूक राहिल्यास समाजात तुमची प्रतिमा सुधारेल. पैशाशी संबंधित कोणत्याही व्यवहारात सावधगिरी बाळगा. कागदपत्रे नीट तपासा. अन्यथा, तुम्हाला काही आर्थिक समस्या देखील येऊ शकतात. व्यवसायात तुमच्या कामाचा दर्जा सुधारण्यावर भर द्या, असे श्रगीणेश सांगतात.

तूळ : वाहने जपून चालवा

श्रीगणेश म्हणतात की, आज सामाजिक कार्यात सहभागी व्‍हाल. ध्येयावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. समाजात मान-सन्मान राहील. वाहने जपून चालवा. व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात. कर्मचारी आणि सहकाऱ्यांशी मैत्रीपूर्ण वागा. पती-पत्नीमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून गैरसमज होऊ शकतात.

वृश्चिक : तणावामुळे तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होण्‍याची शक्‍यता

घराच्या नूतनीकरणाबाबत कुटुंबातील सदस्यांसोबत चर्चा होईल. कोणतेही काम करण्याआधी विचारपूर्वक निर्णय घेतला तर आर्थिक समस्या टाळता येतील. थोडासा निष्काळजीपणा नुकसानदायक ठरेल. स्वभाव संतुलित ठेवा. तणावामुळे तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होण्‍याची शक्‍यता.

धनु : सरकारी कामाशी संबंधित व्यवसायात मोठे यश मिळण्याची शक्यता

आज पाहुणचारात वेळ जाईल, असे श्रीगणेश सांगतात. मालमत्ता किंवा वाहन खरेदी संबंधित कल्पना असल्यास वेळ चांगली आहे. विद्यार्थी अभ्यासाबाबत सतर्क राहतील. अनावश्यक खर्च तुम्हाला त्रास देऊ शकतात. सरकारी कामाशी संबंधित व्यवसायात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रगतीची शक्यताही जास्त आहे.

मकर : नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा

श्रीगणेश म्हणतात की, सामाजिक आणि व्यावसायिक दोन्ही बाबतीत तुमचे वर्चस्व कायम राहील. घरामध्ये धार्मिक कार्यक्रम आयोजित केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळेल. कार्यक्षेत्रात महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका. नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा. वैवाहिक जीवनातील एकमेकांच्या भावनांचा आदर करा.

कुंभ: विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देण्याची गरज

आज परिश्रम अधिक करावे लागतील. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासाकडे कामात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. राग टाळा. कार्यक्षेत्रात काही अडचणी येतील. विशेषतः भागीदारीच्या कामात पारदर्शकता खूप महत्त्वाची आहे. तुमच्या घराच्या व्यवस्थेत बाहेरच्या व्यक्तीला हस्तक्षेप करू देऊ नका, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

मीन : अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा

आज सावध राहून तुम्ही तुमची कामे चांगल्या प्रकारे पार पाडू शकाल. काही महत्त्वाच्या कामात घरातील वरिष्ठ व्यक्तीची मदत घ्या. त्यांच्या योग्य सल्ल्याने तुम्हाला यश नक्की मिळेल, असे श्रीगणेश सांगतात. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांसोबत सुरू असलेला वादही सोडवला जाईल.

Back to top button