नागपूर: मद्यधुंद तरुणाने तशाही स्थितीत घेतली कार रिव्हर्स अन्…!

नागपूर  हिट अँड रन
नागपूर हिट अँड रन

नागपूर, पुढारी वृत्तसेवा :  दिवसभर खेळणी विकून उदरनिर्वाह करणाऱ्या आणि रात्री फुटपाथवर झोपलेल्या राजस्थानी लोकांना एका मद्यधुंद कारचालकाने अगदी खेळण्यातल्या कारसारखेच अमानुषपणे उडविले. अपघातानंतरही त्याने जणू काही घडलेच नाही या अविर्भावात कार रिव्हर्स घेतली आणि जखमी पुन्हा चिरडले गेले, हे युवक कार घेऊन पळून गेले. मात्र, सीसीटीव्हीत हा सर्व अपघात कैद झाल्याने पोलिसांनी कारचालक भूषण लांजेवारला (एमएच 46 एक्स 8498) कारसह अटक केली आहे.

उपराजधानीत दिवसागणिक हिट अँड रन अपघात होत आहेत. शनिवारी नंदनवन, रविवारी कामठीत झालेल्या अपघातानंतर सोमवारी मध्यरात्री वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी चौकाजवळ एक भीषण अपघात घडला. वाढदिवसाची पार्टी करून येणाऱ्या मद्यधुंद तरुणांच्या एका वेगवान कारने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडले. दोघांचा मृत्यू झाला तर बालकासह 7 जण गंभीर जखमी आहेत. कांतीबाई गजोड बागडीया (42),सीताराम बाबूलाल बागडीया(37) अशी मृतकांची नावे आहेत. वंश झाडे या तरुणाच्या वाढदिवस पार्टीच्या निमित्ताने भूषण लांजेवार, सौरभ कडुकर,सनमय पत्रेकर,अथर्व बाणाईत,अथर्व मोगरे,ऋषिकेश चौबे हे सात मित्र ढाब्यावरून घरी परतत असताना हा भीषण अपघात घडला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news