Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | सोमवार, २९ एप्रिल २०२४ | पुढारी

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | सोमवार, २९ एप्रिल २०२४

चिराग दारूवाला :

 

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष : आज इच्छित कार्य पूर्ण झाल्याने मनाला शांती मिळेल. प्रयत्‍न केल्‍यास उधार दिलेले पैसे परत मिळण्‍याची शक्‍यता आहे. मनोरंजनात वेळ जाईल. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे हानिकारक ठरेल. नोकरदारांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुमचे काम प्रामाणिकपणे करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. जास्त कामाचा भार आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतो.

वृषभ : श्रीगणेश सांगतात की, भविष्यातील ध्येयावर लक्ष केंद्रित करुन वाटचाल केल्‍यास तुम्हाला यश मिळेल. घरामध्ये काही धार्मिक किंवा अध्यात्मिक कार्यक्रमाशी संबंधित कामे होतील. महत्त्वाचे करार होण्‍याची शक्‍यता. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील. घशाचे इन्फेक्शन जाणवेल.

मिथुन : श्रीगणेश सांगतात की, आज कोर्ट-कचेरीशी संबंधित कार्यवाही असेल तर निर्णय तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. तुमच्या सकारात्मक विचारांमुळे मागील काही काळापासून सुरू असलेल्या समस्या नक्कीच सुटतील. भावांसोबतचा वाद शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायासंबंधी तुमच्या भविष्यातील योजना सध्या टाळा. वैवाहिक जीवन सामान्य राहील. तणाव आणि चिंता यामुळे निद्रानाश सारख्या तक्रारी उद्भवू शकतात.

कर्क : आज तरुणाई आपलं ध्येय साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. एखादे अशक्य कार्य अचानक पूर्ण केल्याने समाधान मिळेल; परंतु आज आपल्या वैयक्तिक बाबी बाहेरील लोकांसमोर उघड करू नका, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. घरातील सुविधांवर खर्च करताना तुमच्या बजेटकडे लक्ष द्या. शेजाऱ्यांशी वाद टाळा. घरातील काही समस्यांमुळे पती-पत्नीच्या नात्यात तणाव निर्माण होईल. रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी.

सिंह: आज मुलांचे शिक्षण आणि करिअरशी संबंधित काही महत्त्वाची कामे पूर्ण होतील. कुटुंबात मागील काही काळापासून सुरू असलेली बेशिस्‍त दूर करण्यासाठी महत्त्वाचे नियम बनवाल. अनावश्यक गोष्टींकडे लक्ष न देता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे फायदेशीर ठरेल, अशी सूचना श्रीगणेश करतात. व्यवसायाव्यतिरिक्त इतर क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करा. पती-पत्नी परस्पर तडजोडीने कुटुंबाचे योग्य व्यवस्थापन करतील.

कन्या : आज तरुणांना त्यांच्या मेहनतीनुसार योग्य फळ मिळाल्याने दिलासा मिळेल. ज्येष्ठांच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनाचे पालन केल्याने व्यक्तिमत्त्वात अधिक प्रभावी होईल. झटपट यश मिळवण्याच्या इच्छेने कोणतेही अनुचित काम करू नका, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. मुलांचे मनोबल टिकवण्यासाठी तुमचे सहकार्य आणि मार्गदर्शनही आवश्यक आहे. कुटुंबाची काळजी घेण्यासाठी आणि कामात मदत करण्यासाठी वेळ द्या. वातावरण बदलाचा आरोग्‍यावर परिणाम होईल.

तूळ : श्रीगणेश सांगतात की, तुमचा काही ठराविक लोकांशी संपर्क राहील. महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा होईल. तुम्हाला दैनंदिन जीवनाव्यतिरिक्त काही नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. कौटुंबिक जबाबदाऱ्याही चांगल्या प्रकारे पार पाडाल. कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांचा सल्लाही घ्या. कोणत्‍याही कामात अहंकार येऊ देऊ नका. मुलांशी मैत्रीपूर्ण वागा. व्यावसायिक क्षेत्रात बाहेरच्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. कुटुंबासोबत मनोरंजनासह खरेदीमध्‍ये आनंदात वेळ व्‍यतित कराल.

वृश्चिक : आजचा दिवस संमिश्र असेल. कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे, असे श्रीगणेश सांगतात. तुमची मेहनत फळाला येईल. जवळच्या नात्यांमध्ये काही काळ सुरू असलेले वाद कुणाच्या तरी हस्तक्षेपाने मिटतील. मार्केटिंगशी संबंधित कामात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा राहिल.

धनु: आज आत्मविश्वासाने बहुतेक कामे पूर्ण होतील. व्यस्त असूनही तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामांना वेळ द्‍याल. कुटुंबाशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णयही घ्यावे लागतील. इतरांची जबाबदारी स्‍वत:वर घेतल्‍याने त्रास होईल. त्यामुळे तुमच्या क्षमतेनुसार काम करा. विद्यार्थ्यांनी करिअरकडे दुर्लक्ष करु नये, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. कार्यक्षेत्रात काही काळापासून सुरू असलेल्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल.

मकर : आज जवळच्या नातेवाइकांशी सुरू असलेले मतभेद दूर होतील. नोकरीशी संबंधित मुलाखतीत तरुणांना यश लाभेल. कुटुंबाशी संबंधित घेतलेले महत्त्वाचे निर्णय सकारात्मक परिणाम देतील, असे श्रीगणेश सांगतात. प्रिय मित्राबाबत अप्रिय माहिती मिळाल्याने मन अस्वस्थ होईल. कार्यक्षेत्रात मनाप्रमाणे काम होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

कुंभ : जमीन खरेदी-विक्रीशी संबंधित काही कामे पूर्ण होतील. सामाजिक कार्यात तुमचे योगदान तुम्हाला मानसिक शांती देईल. कोणत्याही नकारात्मक सवयी सोडण्याचा संकल्प करा. कोणतीही योजना राबविण्यापूर्वी नीट विचार करावा. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे चांगले. एखाद्याच्या चुकीवर राग व्यक्त करण्याऐवजी शांतपणे वागा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात., व्यवसायिक कामे सामान्य राहतील. कुटुंबासोबत मनोरंजनाच्या कामातही वेळ जाईल.

मीन : श्रीगणेश म्‍हणतात की, आज सामाजिक कार्यात सहभागी व्‍हाल. घराच्या देखभालीशी संबंधित काही योजना असतील. तरुणांची कोणत्याही संभ्रमातून सुटका होईल. जवळच्या नातेवाईकांशी संबंध बिघडण्‍याची शक्‍यता. यावेळी वैयक्तिक जीवनाशी संबंधित कोणत्याही कामात धोका पत्करू नका. पचनक्रिया मजबूत होण्यासाठी पौष्टिक आहार घ्या.

Back to top button