खडसे यांच्या प्रवेशाचे फडणवीस यांनीही केले स्वागत | पुढारी

खडसे यांच्या प्रवेशाचे फडणवीस यांनीही केले स्वागत

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पनेवर विश्वास ठेवून येणाऱ्यांचे आम्ही स्वागतच करणार या शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या भाजपमध्ये प्रवेशाबद्दल माध्यमांसमोर पहिली प्रतिक्रिया दिली. एकनाथ खडसे यांचा प्रवेश कधी होणार, या संदर्भात छेडले असता फडणवीस म्हणाले अद्याप आम्हाला पक्षाकडून अशी कुठलीही सूचना नसली तरी त्यांच्या प्रवेशाला विरोध असण्याचे काहीच कारण नाही. मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्ष येणाऱ्या सर्वांचे आम्ही स्वागतच करतो. गेले काही दिवस खडसे यांच्यात प्रवेशावरून उलट सुलट चर्चा सुरू आहे. या संदर्भात अलीकडेच चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील देवेन्द्र फडणवीस यांचा खडसेंच्या प्रवेशाला विरोध नसल्याचे सांगितले होते. उद्या मंगळवारी सकाळी लक्ष्मीनगर परिसरातून नूतनवर्षं स्वागत निमित्ताने निघणाऱ्या रॅलीत फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहभागी होणार आहेत।

Back to top button