Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | सोमवार ८ एप्रिल २०२४ | पुढारी

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | सोमवार ८ एप्रिल २०२४

चिराग दारूवाला :

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष : आजचा बहुतांश वेळ घर-कुटुंब आणि नातेवाईकांसोबत व्‍यतित कराल. ग्रहस्थिती काही प्रमाणात फायदेशीर परिस्थिती निर्माण करत आहेत. त्यामुळे या वेळेचा पुरेपूर उपयोग करा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी कोणतेही संभाषण किंवा महत्त्वाचे काम करण्यापूर्वी सखोल चौकशी करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. व्यवसायिक कामे प्रलंबित राहण्‍याची शक्‍यता. आरोग्य चांगले राहिल.

वृषभ: सर्जनशील कार्यासह अभ्यासात आज विशेष रुची राहील, असे श्रीगणेश सांगतात. जुन्या समस्येवर उपाय शोधाल. कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्‍या. धोकादायक कामांपासून दूर राहा. अन्‍यथा नुकसान होईल. जवळच्या नातेवाईकांशीही वाद होण्‍याची शक्‍यता. मात्र कुणाच्या तरी हस्तक्षेपाने ते सुटतील. नोकरीच्या ठिकाणी धैर्य आणि आत्मविश्वासाने रखडलेली कामे पूर्ण कराल. कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनात समन्वय राखाल. तुमची दैनंदिन दिनचर्या योग्‍य ठेवा. अति खाणे टाळा.

मिथुन : श्रीगणेश सांगतात की, आज धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात तुमची आवड वाढेल. जवळच्या नातेवाईकाशी किंवा मित्राशी मतभेद होऊ शकतात, आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळा. या क्षेत्रात अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. पती-पत्नीचे नाते मधूर राहिल. अतिकामामुळे शरीरिक थकवा जाणविण्‍याची शक्‍यता.

कर्क : श्रीगणेश म्‍हणतात की, आज कोणत्याही फोन कॉलकडे दुर्लक्ष करू नका, कारण तुम्‍हाला महत्त्वाच्या सूचना प्राप्त होऊ शकतात. मार्केटिंगवरही लक्ष केंद्रित करा. अनोळखी लोकांवर विश्वास ठेवणे हानिकारक ठरू शकते. भविष्यातील नियोजनात इतरांपेक्षा स्वतःच्या निर्णयाला प्राधान्य द्या. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. बदलत्या वातावरणामुळे अशक्तपणा, थकवा जाणवेल.

सिंह : कौटुंबिक आणि आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस शुभ आहे. वैयक्तिक कामात यश मिळाल्याने मनःशांती मिळेल. सर्वात कठीण कामे दृढनिश्चयाने पूर्ण करण्याची क्षमता ठेवा. आत्मविश्वासाने काम करा, यश नक्की मिळेल. इतरांशी चर्चा करण्यापूर्वी तुम्ही चुकीच्या सल्ल्याला बळी पडू शकता. त्‍यामुळे कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा खराब होण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे कोणतीही गोष्‍ट करण्‍यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घ्‍या. कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल.

कन्या : श्रीगणेश सांगतात की, आज थोडावेळ तुम्ही स्वतःसाठी काढावा. आत्मनिरीक्षणामुळे तुम्हाला खूप मनःशांती लाभेल. त्‍याचबरोबर अनेक समस्याही सुटू शकतात. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस तुमच्यासाठी यशदायी आहे. इतरांच्‍या सल्ल्यावर विसंबून राहण्याऐवजी स्वतःवर विश्वास ठेवा. प्रवास टाळा. कामाच्या ठिकाणी तुमचे व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यात योग्य समन्वय ठेवल्यास कामाला गती मिळेल. घरातील सदस्यांशी सुसंवाद घडेल. महिला आपल्या आरोग्याबाबत जागृक राहतील.

तूळ : श्रीगणेश म्हणतात की, तुम्ही जीवनाला सकारात्मक पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न कराल. तुमचा धर्म आणि अध्यात्मावरचा विश्वास तुमच्यात शांती आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित करेल. कोणालाही सल्ला देऊ नका. विद्यार्थी अभ्यासात लक्ष न देता भटकंतीमध्‍ये वेळ वाया घालवतील. तुम्ही कामाच्या ठिकाणी कमी वेळ द्याल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल. आरोग्य उत्तम राहू शकते.

वृश्चिक : आज घर नूतनीकरणाशी संबंधित महत्त्वाच्या योजना असतील, असे श्रीगणेश सांगतात. मालमत्तेबाबत किंवा अन्‍य मुद्द्यावर कुटुंबात सुरु असणारा गैरसमज कोणाच्या तरी हस्तक्षेपामुळे दूर होऊ शकतो. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल; परंतु अनोळखी व्यक्तींकडून कोणताही व्यवहार किंवा सल्ला घेणे टाळा. सध्या कार्यक्षेत्रात काही चांगले परिणाम मिळणे शक्य नाही, सध्या कामाशी संबंधित काही धोरणे बदलण्याची गरज आहे. पती-पत्नीचे नाते सहकार्याचे असेल. बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होण्‍याची शक्‍यता.

धनु : श्रीगणेश म्‍हणतात की, मागील काही दिवस सुरु असेली समस्‍या दूर झाल्‍याने घरातील वातावरण सकारात्मक राहील.नातेसंबंध सुधारतील. बऱ्याच दिवसांपासून रखडलेले आर्थिक व्‍यवहार पूर्ण होतील. शेजाऱ्यांशी वाद टाळा. तरुणांनी आपल्या करिअरबाबत अधिक जागरूक राहावे. आज काही नोकरदारांमुळे कामाच्या ठिकाणी तणाव असू शकतो. जास्त कामामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ देऊ शकणार नाही. तणाव आणि थकवाचा आरोग्यावर परिणाम होईल.

मकर : आज कौटुंबिक वाद दूर झाल्‍याने घरामध्ये शांतता अनुभवाल. वैयक्तिक क्रियाकलापांवर अधिक लक्ष केंद्रित करू शकाल. जवळच्या मित्राचे सहकार्यही तुमचे मनोबल टिकवून ठेवेल, श्रीगणेश सांगतात. संततीच्या अभ्यासाशी संबंधित घाई गडबडीने निर्णय घेवू नका. घजोडीदाराचे पूर्ण सहकार्य असेल. आरोग्य उत्तम राहिल.

कुंभ : आज सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तुमचे वर्चस्व राहील. असे गणेश सांगतात. तुम्ही अनेक प्रकारच्या कामांमध्ये व्यस्त राहू शकता. खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात निश्चित धोरण तयार करून काम करा. तुम्ही फक्त इतर लोकांच्या मदतीला अधिक भेदभाव करू शकता. पती-पत्नी एकमेकांशी असलेला संवाद चांगल्या प्रकारे समजून घेतील. सध्याचे नकारात्मक वातावरण आणि हवामान बदलापासून सावध रहा

मीन : श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. अवघड कामे कठोर परिश्रमाने सोडविण्याची क्षमता तुमच्यात असेल. तुमच्या जवळच्या मित्रांवर आणि नातेवाईकांवर विश्वास ठेवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल, रागावर नियंत्रण ठेवा. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी झालेली भेट तुमची रखडलेली कामे पूर्ण करण्यास मदत करेल. पती-पत्नीमध्ये सुसंवाद राखता येईल. डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो.

Back to top button