‘त्यांनी सांभाळून बोलावे’, गिरीश महाजनांचा नाव न घेता एकनाथ खडसेंना इशारा | पुढारी

'त्यांनी सांभाळून बोलावे', गिरीश महाजनांचा नाव न घेता एकनाथ खडसेंना इशारा

जळगाव- पुढारी वृत्तसेवा– भाजपाने पाच महिलांना तिकीट दिले आहे. महिला आरक्षण 33 टक्के जरी असले तरी जळगाव जिल्ह्यात शंभर टक्के आरक्षण मिळाले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांमध्ये पाच लाखापेक्षा जास्त मताधिक्य घेणार असल्याचा विश्वास भाजपाच्या बैठकीत नामदार गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

तिकीट जाहीर झाल्यानंतर भाजपाच्या ब्राह्मण संघ येथे पहिली बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना नामदार गिरीश महाजन म्हणाले की, आम्ही पूर्वीही सर्वसामान्य कार्यकर्ते होतो आणि आजही सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत. जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार विक्रमी मतांनी निवडून आणायचे आहे. समोरच्या पक्षाला उमेदवार सापडत नाही आहे, जी नावे कोणाला माहिती नाही अशी नावे पुढे येत आहे. यामुळे महाराष्ट्रात भाजप विक्रम करणार असेही ते म्हणाले. यावेळी वादाच्या विषयावर पडदा टाकत टीम वर्कने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षामध्ये सुरु असलेल्या अंतर्गत वादावरही त्यांनी भाष्य केले.  ते म्हणाले आपल्यामध्ये पारिवारिक भावना आहेत. भाजपाला कुत्र विचारत नव्हते या एकनाथ खडसे यांच्या विधानावर बोलताना म्हणाले की, ज्या काळात कोणी नव्हते त्या काळात निष्ठावंत कार्यकर्त्योंच्या जोरावर निवडणुका लढवल्या जात होत्या. मुक्ताईनगर मध्ये 1978 मध्ये फडके पाचशे मतांनी पडले होते. त्यावेळेस कोणी नव्हते फक्त निष्ठावंत कार्यकर्ते होते. आम्ही नशीबवान आहोत की आम्ही निवडून आलो आणि या इथपर्यंत आलो. ते पण निवडून आले त्यांच्या घरामध्ये सर्वांना पदे मिळाले. एकदा काय अपयश आले तर ते पीछे मूड करून पक्षच बदलला ही कोणती निष्ठा असाही प्रश्न त्यांनी खडसेंवर उपस्थित केला.

आम्ही खपवून घेणार नाही

यापुढे काहीही बोललेले तर आम्ही खपवून घेणार नाही. सांभाळून बोलावे. पक्षाने एवढे दिले आहे की त्याची तुलना कुत्र्याबरोबर होणार नाही. आजही आमच्या मनात कोणताही दुजाभाव नाही. गिरीश महाजन व खडसे यांच्यामध्ये 36 चा आकडा आहे. मात्र ज्यावेळेस रक्षा खडसेंना तिकीट देण्याचा प्रश्न आला त्यावेळेस आम्ही सांगितलं की काही अडचण नाही. त्यामुळे त्यांनी सांभाळून बोलावे असा खडा इशारा गिरीश महाजन यांनी खडसे यांना नाव न घेता दिला.

Back to top button