खडसे आजारी! रावेर लोकसभेसाठी शरद पवार गटाकडून उमेदवाराचा शोध, ‘ही’ तीन नावे चर्चेत | पुढारी

खडसे आजारी! रावेर लोकसभेसाठी शरद पवार गटाकडून उमेदवाराचा शोध, 'ही' तीन नावे चर्चेत

जळगाव : नरेंद्र पाटील- रावेर लोकसभा मतदारसंघ हा जिल्ह्याच्या नाहीतर राज्याच्या राजकारणात खूप मोठ्या उलथापालथी करणारा जिल्हा आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सून विरुद्ध सासरा किंवा संकटमोचक विरुद्ध खडसे असा सामना रंगणार असे चित्र दिसत असतानाच वैद्यकीय कारणांमुळे खडसे बॅकफुटवर गेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला त्या तोडीचा उमेदवार शोधण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. या दृष्टीने तीन उमेदवारांची नावे समोर येऊ लागलेली आहे. मात्र नशीब कुणाचे फडफडणार व शरद पवार कोणाला आशीर्वाद देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आज रावेर लोकसभा मतदार संघाची निवडणूक रावेर पूर्ती न राहता ती राज्य पातळीवर परिणाम करणारी झालेली आहे. प्रत्येक पक्ष-अपक्ष कार्यकर्त्यांचे लक्ष या रावेर लोकसभा निवडणूकडे लागलेले आहे. महाविकास आघाडी मध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे गेलेली आहे. यापूर्वीच एकनाथ खडसे यांनी आपण लोकसभेची निवडणूक लढणार आहोत असे जाहीर केले होते मात्र मध्यंतरी त्यांच्या शरीर प्रकृतीने साथ न दिल्यामुळे आज ते डॉक्टरच्या सल्ल्याने निवडणूक लढायची की नाही लढायची या विचारात आहेत व तसे त्यांनी जाहीर केलेले आहे. डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतरच आपण लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचे खडसेंनी स्पष्ट केले आहे.

त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह जरी निर्माण झालेले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून खडसेंऐवजी कोण उमेदवार असेल यासंदर्भात चर्चा ही सुरू झाली आहे.

पहिलं नाव

यात सर्वांधिक पहिले नाव म्हणजे शरद पवारांचे जवळचे व विश्वासातील जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील मात्र ते जेव्हाही निवडणुकीत उभे राहिलेले आहेत तेव्हा विजयापर्यंत पोहोचू शकलेले नाही. मताधिक्य मिळालेले आहे परंतु विजयाचा शिरे टोप त्यांच्या डोक्यावर दिसून आलेला नाही हा त्यांच्या निवडणुकीच्या कारकिर्दीतील इतिहास आहे.

दुसरं नाव

दुसरं नाव आहे ते शरद पवार अजित पवार या दोन्ही गटांमधील विनोद तराळ या व्यक्तीने राज्यात आपली एक आगळी वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. फर्टीलायझर्स या संघटनेच्या माध्यमातून चोपडा थेट नादुर पर्यंत त्याचे वर्चस्व आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने केलेल्या सहकार्यामुळेच आमदार चंद्रकांत पाटील विजयी झाले होते हा इतिहास आहे.

तिसरं नाव

यावलचे माजी नगराध्यक्ष व शरद पवार गटाचे लोकसभा संपर्कप्रमुख अतुल पाटील यांचेही नाव या यादीत आहे.
त्यांनीही आपल्या कर्तुत्वाने चांगला ठसा उमटवलेला आहे. या तीन जणांच्या नावाची चर्चा असून त्यात कुणाची वरणी लागते हे पाहावे लागणार आहे. जर डॉक्टरांनी खडसेंना वैद्यकीय कारणाने उमेदवारी करण्याचे नाकारले तर या तीन जणांच्या नावापैकी कोणत्याही एका नावाची घोषणा होऊ शकते.

हेही वाचा

Back to top button