Mahayuti first joint meeting : आज महायुतीचा पहिला संयुक्त मेळावा | पुढारी

Mahayuti first joint meeting : आज महायुतीचा पहिला संयुक्त मेळावा

नागपुर; पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता महायुतीकडून राज्यात प्रत्येक जिल्ह्यात आज (दि 14) महामेळावे घेतले जाणार आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यात मार्गदर्शन करण्याकरिता महायुतीतर्फे नेत्यांची निवड करण्यात आली आहे. रविवारी भाजप, शिवसेना, अजित पवार गट, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, शिवसंग्राम, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आणि अन्य सर्व मित्रपक्षांचा आज (दि 14) सकाळी ९.३० वाजता वसंतराव देशपांडे सभागृहात जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेश अध्यक्ष चित्राताई वाघ व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे मार्गदर्शन करणार आहेत.
या मेळाव्यात जिल्ह्यातील माजी खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार प्रविण दटके, मोहन मते, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश संघटक कपील लिंगायत, माजी महापौर संदीप जोशी, प्रा. संजय भेंडे, भाजपा शहर अध्यक्ष बंटी कुकडे कुकडे, संदीप गवई, माजी आमदार मिलिंद माने, विलास त्रिवेदी, चंदन गोस्वामी, आदर्श पटले, शिवसेनेतर्फे संपर्क प्रमुख व समन्वयक मंगेश काशीकर, जिल्हाप्रमुख संदीप इकटेलवार, सुरज गोजे, दिवाकर पाटणे, विनोद सातंगे, समीर शिंदे, जयंत कोकाटे, अमोल गुजर, शुभम नवले, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे शहराध्यक्ष कैलाश बांबोले, राष्ट्रवादी कॅाग्रेसतर्फे शहर अध्यक्ष प्रशांत पवार, जिल्हा अध्यक्ष बाबा गुजर, ईश्वर बाळबुधे, श्रीकांत शिवणकर, सतीश शिंदे, बहुजन रिपब्लिकन एकता मंचतर्फे संदीप कांबळे, रिपाई (आठवले) तर्फे विनोद थुल आदी प्रामुख्याने उपस्थित राहतील.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नागपूर व रामटेक या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी कामाचे व्यवस्थापन करणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या लोकोपयोगी योजना, देशातील महायुती सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविणे तसेच जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधणे आणि विविध प्रकल्प आणि विकासकामांची माहिती नागरिकांना देणे अशा प्रकारचे नियोजन मेळाव्यात करण्यात आले आहे. घटक पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये समन्वयाने काम व्हावे, हाही मेळाव्याचा उद्देश आहे, अशी माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेश संघटक मृणाल गोस्वामी यांनी दिली.

Back to top button