अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार; चिखलीकरांचा दावा | पुढारी

अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार; चिखलीकरांचा दावा

नांदेड; पुढारी वृत्तसेवा : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रवेश सोहळ्यात बावनकुळे यांनी खा. प्रतापराव चिखलीकरांच्या कानात अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार असल्याचे सांगितल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर चिखलीकर यांनी काही माध्यमांसमोर येऊन ‘अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील आणि मी त्यांचे स्वागत करेन’, असे जाहीर केले. त्यामुळे जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे.

अशोक चव्हाण हे कितीही पक्षाशी एकनिष्ठ आहेत असे सांगत असले तरी ते भारतीय जनता पक्षात येतील, असा दावा चिखलीकरांनी केला आहे. अर्थात, चव्हाण भाजपमध्ये आले तर चिखलीकर यांचीच कोंडी होणार आहे. जिल्ह्यात बावनकुळे यांच्या दौर्‍यात चिखलीकर यांना डावलल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

Back to top button