Anushka and Virat : विराटसाठी गुड न्यूज निश्चित, अनुष्का दुसऱ्यांदा होणार आई | पुढारी

Anushka and Virat : विराटसाठी गुड न्यूज निश्चित, अनुष्का दुसऱ्यांदा होणार आई

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली यांची जोडी कमालीची लोकप्रिय आहे. विराट-अनुष्काच्या आयुष्याबाबत अधिक जाणून घेण्यास चाहते नेहमी उत्सुक असतात. दरम्यान, विराट कोहलीच्या घरी दुसऱ्यांदा गुड न्यूज येणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. कारण अनुष्का दुसऱ्यांदा आई होणार आहे. अनुष्का बेबी बम्प सोबत स्पॉट झाली आहे. (Anushka and Virat)

पिंक व्हिला या इन्स्टाग्राम पेजवरुन अनुष्का आणि विराट एकत्र जात असतानाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ‘अनुष्का शर्मा – विराट कोहलीला मागील काही दिवसांत मुंबईतील एका रुग्णालयाबाहेर स्पॉट करण्यात आलं होतं. जिथे दोघांनीही पॅपराझींना त्यांचे फोटो शेअर न करण्याची विनंती केली होती. शिवाय, हेदेखील म्हटले होते की, दोघे लवकरच स्वत: अधिकृतपणे घोषणा करतील. (Anushka and Virat)

या कपलने आपल्या घरात गणपतीची प्रतिष्ठापना देखील केली होती. त्याचे फोटोजदेखील सोशल मीडियावर अपलोड केले होते. भारतीय पोषाखात अनुष्का शर्मा खूप सुंदर दिसत होती. अनुष्का शर्माने काही दिवसांपूर्वी ‘चकदा एक्सप्रेस’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. चित्रपटामध्ये ती माजी भारतीय क्रिकेटर झूलन गोस्वामीच्या भूमिकेत आहे. (Anushka and Virat)

 

View this post on Instagram

 

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

हेही वाचलंत का?

Back to top button