NCP Crisis:’अजित पवार गटाकडून बोगस कागदपत्रे’ शरद पवार गटाकडून मनोज संघवी यांचा युक्तिवाद | पुढारी

NCP Crisis:'अजित पवार गटाकडून बोगस कागदपत्रे' शरद पवार गटाकडून मनोज संघवी यांचा युक्तिवाद

पुढारी ऑनलाईन डेस्क: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाच्या लढाईसाठी राष्ट्रवादीचे दोन्ही गट आज केंद्रीय निवडणुक आयोगात आमने-सामने आले. यावेळी अजित पवार गटाकडून बोगस कागदपत्रे सादर झाली असा युक्तिवाद शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनोज संघवी यांनी केला आहे. (NCP Crisis)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह कोणाचे? या संदर्भातील सुनावणी आज (दि.९) केंद्रीय निवडणुक आयोगात पार पडली. यावेळी केंद्रीय निवडणुक आयोगात राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही गटाचे प्रमुख नेते उपस्थित होते. यामध्ये शरद पवार गटाकडून शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. तर अजित पवार गटाकडून प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, रूपाली चाकणकर हे निवडणुक आयोगात सुनावणी दरम्यान उपस्थित होते. (NCP Crisis)

केंद्रीय निवडणुक आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह कोणाचे या संदर्भात तिसऱ्यांदा सुनावणीला सुरूवात झाली. गेल्या सुनावणीत अजित पवार गटाने बाजू मांडली होती. त्याला उत्तर म्हणून आज अभिषेक मनु सिघवी बाजू मांडली. शरद पवार गटाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर सिंघवी यांनी ‘अजित पवार गटाकडून बोगस कागदपत्रे सादर झाली’ असा दावा केला. (NCP Crisis)

‘घड्याळ तेच, वेळ नवी’ हा अजित पवार गटाचा नारा आहे. घोषवाक्यात चिन्हाचा उल्लेख आहे म्हणजे घड्याळ चिन्ह आपल्यालाच मिळणार याचा त्यांना पूर्ण आत्मविश्वास दिसतोय. राष्ट्रवादीच्या घड्याळावरची वेळ 10 वाजून 10 मिनिटांची आहे, असा युक्तिवाद अभिषेक मनोज संघवी यांनी शरद पवार गटाकडून केला. (NCP Crisis)

Back to top button