Payal Ghosh and Mohammed Shami : ‘इंग्लिश शिकून घे, मी लग्नासाठी तयार’; मोहम्मद शमीला अभिनेत्रीची खास ऑफर | पुढारी

Payal Ghosh and Mohammed Shami : 'इंग्लिश शिकून घे, मी लग्नासाठी तयार'; मोहम्मद शमीला अभिनेत्रीची खास ऑफर

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी २०२३ च्या वनडे विश्वचषकातील आक्रमक आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून समोर आला आहे. त्याच्या आक्रमक माऱ्यामुळे टीम इंडियाला २ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. त्याने ४ सामन्यांमध्ये १६ विकेट्स पटकावत धडक कामगिरी केली आहे. दरम्यान, शमीच्या ही कामगिरी पाहून अभिनेत्री पायल घोष चांगलीच प्रभावित झाली आहे. तिने थेट मोहम्मद शमीला लग्नाची मागणी घातली आहे. (Payal Ghosh and Mohammed Shami)

इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून बॉलीवुड अभिनेत्री पायल घोष हिने शमीला लग्नाची ऑफर दिली आहे. या पोस्टमध्ये पायल म्हणते, “#Shami Tum apna English sudharlo, I’m ready to marry you” मोहम्मद शमीची घटस्फोटीत पत्नी हसीन जहान सध्या त्याच्या विरोधात बोलतना दिसत आहे. यातच अभिनेत्रीने शमीला प्रपोज केल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. (Payal Ghosh and Mohammed Shami)

घटस्फोटीत पत्नीचे शमीवर गंभीर आरोप (Payal Ghosh and Mohammed Shami)

हसीन जहानने शमीवर घरगुती हिंसाचार, इतर महिलांसोबत संबंध असे गंभीर आरोप केले आहेत. त्याचवेळी, वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वीच हसीनने म्हशीसोबतचा फोटो शेअर करताना शमीविरोधात अपशब्द वापरले होते. हसीन जहान आणि मोहम्मद शमी सध्या वेगळे राहतात. (Payal Ghosh and Mohammed Shami)

हेही वाचलंत का?

Back to top button