सुधारणेच्या नावाखाली माथाडी कायदा पांगळा करू नका : डॉ. बाबा आढाव | पुढारी

सुधारणेच्या नावाखाली माथाडी कायदा पांगळा करू नका : डॉ. बाबा आढाव

पुणे : सामान्य कष्टकरी हमाल मापाडी यांना सामाजिक संरक्षण देणारा माथाडी कायदा सुधारणेच्या नावाखाली संपविणे अतिशय क्लेशदायक आहे. या कायद्याला पांगळे करण्याचा प्रयत्न होत आहे, हे तत्काळ थांबवा; अन्यथा आम्ही आंदोलन करू, असा थेट इशारा ज्येष्ठ कामगारनेते डॉ. बाबा आढाव यांनी दिला. माथाडी सुधारणा विधेयकाबाबत कामगार संघटनांचे म्हणणे ऐकण्यासाठी विधिमंडळाच्या संयुक्त समितीने महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळासह मुंबईतील माथाडी संघटनांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आयोजित करण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

या वेळी त्यांनी हा इशारा दिला. या वेळी उपाध्यक्ष राजकुमार घायाळ, नरेंद्र पाटील, बळवंतराव पवार, अरुण रांजणे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार भाई जगताप, पोपटराव देशमुख, गुलाबराव जगताप, सहचिटणीस हनुमंत बहिरट उपस्थित होते. या वेळी घायाळ व बहिरट यांनी महामंडळाचे म्हणणे समितीसमोर मांडले. समितीने सरकारला हे विधेयक मागे घेण्याची शिफारस करावी. राज्यात माथाडी कायद्याचा दुरुपयोग करणार्‍यांविरोधात उपाययोजना सुचविण्यासाठी निष्पक्ष त्रिपक्षीय समिती स्थापन करण्याची विनंती केली.

 

Back to top button