Ganesh Visarjan 2023 | घरामध्ये गर्भवती स्त्री असताना गणपती विसर्जन करावे का? | पुढारी

Ganesh Visarjan 2023 | घरामध्ये गर्भवती स्त्री असताना गणपती विसर्जन करावे का?

पुढारी ऑनलाईन डेस्क : आबालवृद्धांचा उत्साहाचा सण म्हणजे आपल्या बाप्पाचा सण अर्थात गणेशोत्सव. सगळीकडे गणेश चतुर्थी उत्साहात साजरी केली जात आहे. लहानांपासून-मोठ्यांपर्यंत सर्वांची धावपळ आपल्या बाप्पाच्या सेवेसाठी तत्पर असतात.  बाप्पाचे आगमन, गौरी आवाहन, गौरी पुजन नंतर येतो तो दिवस म्हणजे आपल्या बाप्पाचे विसर्जन. पण काही घरात गर्भवती स्त्री असताना गणपती विसर्जन करावे का? याबाबत बरेच समज-गैरसमज पाहायला मिळतात. पंचांगकर्ते ओंकार मोहन दाते गर्भवती स्त्री असतानाही गणपती विसर्जन करावे का? याबाबत माहिती दिली आहे. (Ganesh Visarjan 2023)

 संबधित बातम्या

Ganesh Visarjan 2023 : विसर्जन न करण्याची प्रथा चुकीची

पंचांगकर्ते ओंकार मोहन दाते सांगतात, “घरामध्ये गर्भवती स्त्री असतानाही गणपती विसर्जन करावे. अशा वेळेस विसर्जन न करण्याची प्रथा चुकीची आहे. ही प्राणप्रतिष्ठा करून बसविलेली मूर्ती उत्तरपूजा करून देव्हार्‍यातून खाली काढतात व तिचे पाण्यात विसर्जन करतात.

वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे का?

वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे का? याबाबत अनेक गैरसमज लोकांमध्ये पाहायला मिळतात. पंचांगकर्ते ओंकार मोहन दाते सांगतात, की वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे असे नसून पाण्यात विसर्जन करावे असे आहे. त्यामुळे तलावात किंवा स्वतंत्र टँकमध्ये, तसेच घरी मोठ्या बादलीमधील पाण्यात सुद्धा विसर्जन करता येते. विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी. प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा तत्सम पाण्यात न विरघळणार्‍या पदार्थांची मूर्ती नसावी.

हेही वाचा :

Back to top button