Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या दरबारात प्रचंड गर्दी; भाविक-स्वयंसेवकांत गोंधळ | पुढारी

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या दरबारात प्रचंड गर्दी; भाविक-स्वयंसेवकांत गोंधळ

मुंबई : पुढारी वृत्तसेवा लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागचा राजाच्या दरबारात दररोज भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. दोन दिवसांपूर्वी लालबागच्या राजा गणपतीच्या दरबारात भाविक आणि मंडळाच्या स्वयंसेवकांमध्ये Among the volunteers शाब्दिक खडाजंगी झाली होती. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जगभरातून लोक येत असतात. या ठिकाणी दररोज भाविकांच्या गर्दीत वाढ होत आहे.

पुढील काही दिवस लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होणार असल्‍याने पोलिसांचा मोठा बंदोबस्‍त ठेवण्यात आला आहे. पोलिसांची गर्दीवर करडी नजर आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक भाविकांवर सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेरा चा वॉच आहे. गर्दीमुळे रांग सुटली होती असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

अचानक वाढलेल्‍या गर्दीमुळे दर्शनासाठी करण्यात आलेली भाविकांची रांग तुटली. यामुळे धक्‍काबुक्‍कीचे प्रसंग घडले. यावेळी स्‍वयंसेवक आणि भाविकांमध्ये शाब्दिक खडाजंगीही झाली. मात्र स्‍वयंसेवकांनी गर्दीवर नियंत्रण आणून पुन्हा दर्शनरांगेतून दर्शनाची व्यवस्‍था निर्माण केल्‍याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हेही वाचा : 

Back to top button