Maghi Ganesh Festival : माघी गणेशजयंती निमित्त श्रींच्या मंदिरांमध्ये भाविकांच्या रांगा, जाणून घ्या काय आहे आख्यायिका…

Maghi Ganesh Festival : माघी गणेशजयंती निमित्त श्रींच्या मंदिरांमध्ये भाविकांच्या रांगा, जाणून घ्या काय आहे आख्यायिका…

पुढारी ऑनलाइन डेस्क : हिंदू कालगणनेप्रमाणे रविवारपासून माघ महिना सुरू झाला आहे. माघ महिना हा अनेक वेगवेगळ्या धार्मिक कार्यांसाठी ओळखला जातो. त्याचप्रमाणे या माघ महिन्यात गणेश जयंती येत असल्याने अनेक ठिकाणी रविवारपासूनच माघी गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. आज 25 जानेवारीला माघ शुक्ल चतुर्थी येत आहे. माघ शुक्ल चतुर्थीला आपण गणेश जयंती साजरी करतो. माघी गणेश जयंतीनिमित्त मुंबईतील सिद्धीविनायकासह राज्यभरातील गणेश मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. जाणून घेऊ या नेमके काय आहे माघी गणेश जयंतीचे महत्व काय आहे आख्यायिका… Maghi Ganesh Festival

Maghi Ganesh Festival : काय आहे माघी गणेशोत्सव

माघ महिन्यात येणारी शुक्ल चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते. या चतुर्थीला विनायकी चतुर्थी आणि वरद चतुर्थी असेही म्हणतात. ही गणेश जयंती गणपतीच्या महोत्कट अवतारासाठी साजरी केली जाते.

Maghi Ganesh Festival : महोत्कट अवताराची पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार पृथ्वीवर नरांतक आणि देवांतक या राक्षसांनी उच्छाद मांडला होता. तेव्हा त्यांचा नाश करण्यासाठी आणि आपल्या लाडक्या भक्तांना संकटातून तारण्यासाठी गणपती बाप्पांनी कश्यप ऋषी आणि देवी आदिती यांच्या घरी महोत्कट अवतार घेतला आणि नरांतक व देवांतक राक्षसांचा अंत केला. माघ शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पांनी हा अवतार घेतला होता. त्यामुळे या दिवशी गणेश जयंती साजरी केली जाते. या जयंतीनिमित्त अष्टविनायक क्षेत्रात आज प्रतिपदेपासून माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. ओझर मोरगाव येथे द्वार यात्रांना प्रारंभ होतो, अशी माहिती मंदिर आणि मूर्ती अभ्यासक प्रसन्ना मालेकर यांनी दिली.

Maghi Ganesh Festival : गणपती पुळे येथे माघी गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

गणपती पुळे येथील संस्थान श्रीदेव येथे गणेश जयंतीनिमित्त माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त श्रींच्या मंदिरात आज रविवारी दि 22 जानेवारी पासून 28 जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. भाविकांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची विनंती संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे.

Maghi Ganesh Festival : माघी गणेशोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रम

कार्यक्रमाची सुरुवात रविवार दिनांक 22 जानेवारीला श्रींची महापूजा व प्रसाद सकाळी 9.30 ते 11.30 या दरम्यान श्रींची महापूजा आणि प्रसादाने होईल. त्यानंतर रविवारी सायंकाळी 4 ते 7 गणेश यागाने देवतेची स्थापना केली जाईल.

सोमवारी दि. 23 जानेवारीला गणेशयाग पूर्णाहूती सकाळी 7 ते 12 यावेळेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

मंगळवारी दि. 24 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 12 सहस्र मोदक समर्पण केले जाईल.

बुधवारी दि.25 जानेवारीला श्रींची पालखी मिरवणूक सायंकाळी 4 वाजता काढण्यात येणार आहे.

शनिवारी दि. 28 जानेारी रथसप्तमीच्या दिवशी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. भाविकांना दुपारी 11.30 ते 2.00 या वेळेत महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे.

Maghi Ganesh Festival : याव्यतिरिक्त रविवार दि. 22 जानेवारी ते गुरुवार दि. 26 जानेवारी दररोज सायंकाळी 7.30 ते 9.30 यावेळेत कीर्तनकार ह.भ.प. मोहक प्रदीप रायकर, डोंबिवली यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी दि. 27 सायंकाळी 7.30 वा. शास्त्रीय अभंग, नाट्यसंगीताची सुरेल मैफिल 'स्वरार्पण' या कार्यक्रमात रंगणार आहे. शनिारी दि. 28 रात्री 10 वाजता हसवा फसवी हे विनोदी नाटक आयोजित करण्यात आले आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news