Baba Ramdev : पैलवानांच्या आंदोलनाला बाबा रामदेव यांचा पाठिंबा; बृजभूषण यांच्याविषयी म्हणाले… | पुढारी

Baba Ramdev : पैलवानांच्या आंदोलनाला बाबा रामदेव यांचा पाठिंबा; बृजभूषण यांच्याविषयी म्हणाले...

पुढारी ऑनलाइन डेस्क : Baba Ramdev : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या विरुद्ध देशातील नामांकित कुस्तीपटूंनी चालवलेल्या आंदोलनाला बाबा रामदेव यांनी पाठिंबा दिला आहे. बृजभूषण यांना तुरुंगात टाकायला हवे, असे म्हटले आहे. तसेच त्यांनी बृजभूषण यांनी महिला कुस्तीपटूंबाबत केलेल्या वक्तव्यांचा देखील निषेध केला आहे.

देशातील टॉपचे कुस्तीपटू साक्षी मलिक, बजरंग पुनिया इत्यादींनी भाजप खासदार आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी 23 एप्रिलपासून त्यांनी धरणे आंदोलन दिले आहे. या आंदोलनाला त्यांनी हरियाणातील खाप पंचायतचा देखील पाठिंबा मिळवला आहे. तसेच नीरज चोप्रा आदि अन्य खेळाडूंनी देखील कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. कुस्तीपटूंच्या या आंदोलनाला आता योगगुरू बाबा रामदेव Baba Ramdev यांनी देखील पाठिंबा दिला आहे. त्यांनी कुस्तीपटूंचे समर्थन केले आहे.

Baba Ramdev : बृजभूषण यांच्याबाबत काय म्हणाले बाबा रामदेव

बाबा रामदेव यांनी बृजभूषण यांच्यावर कडक शब्दांत टीका केली. ते म्हणाले, बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप असून अशा लोकांना तुरुंगात पाठवले पाहिजे, असे बाबा रामदेव म्हणाले. महिला कुस्तीपटूंबाबत बृजभूषण यांच्या वक्तव्याचाही रामदेव यांनी निषेध केला.

कुस्ती महासंघाच्या प्रमुखावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप आहेत. देशातील अव्वल कुस्तीपटू सध्या जंतरमंतरवर बसले आहेत. हे लाजिरवाणे आहे. अशा लोकांना तात्काळ तुरुंगात टाकावे. तो दररोज आपल्या बहिणी आणि मुलींबद्दल काही ना काही लज्जास्पद विधान करतो. ते पाप आहे.’

Baba Ramdev : बृजभूषण सिंह आणि रामदेव यांचा वाद जुना

दरम्यान, एकीकडे कुस्तीपटूंचे बृजभूषण यांच्याविरोधात आंदोलन सुरू असताना दुसरीकडे बृजभूषण यांच्याकडून देखील कुस्तीपटूंविषयी दररोज वेगवेगळी वक्तव्ये येतात. कुस्तीपटू आणि बृजभूषण यांच्यात सातत्याने आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा संबंध मोठ्या उद्योगपतीशी आहे, असे गंभीर आरोप केले होते. तसेच त्यांनी नाव न घेता रामदेव बाबा यांच्यावरही निशाणा साधला होता. त्यानंतर आता बाबा रामदेव यांनी कुस्तीपटूंना पाठिंबा त्यांचे वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

बृजभूषण सिंह आणि बाबा रामदेव यांच्यातील वाद जुना आहे. गेल्या वर्षी खासदार बृजभूषण सिंह यांनी पतंजलीच्या उत्पादनांवर प्रश्न उपस्थित केला होता. रामदेव महर्षी पतंजली यांच्या नावाचा गैरवापर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांनी पतंजलीच्या अनेक गोष्टी खोट्या म्हटले. यानंतर रामदेव यांनी बृजभूषण यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तेव्हापासून दोघांमध्ये वाद सुरू आहे.

हे ही वाचा :

Wrestlers Protest : कुस्तीपटूंचे आंदोलन चिघळले; महावीर फोगाट करणार द्रोणाचार्य पुरस्कार परत! 

नार्को टेस्टला सामोरे जाण्यास कुस्तीपटू तयार, बृजभूषण यांचे आव्हान स्वीकारले

Back to top button